पावसाळा सुरु झाल्यावर रानभाज्यांचा हंगाम सुरु होतो.
फांगभाजीबांध, माळावर सपाट किंवा झुडपांवर वाढते. यात खनिजे, फॉस्फरस, तंतुमय घटक मोठ्या प्रमाणात असल्याने, भूक लागते, पोट साफ करते व पित्तशामक असते.
टाकळाइसब, ॲलर्जी, सोरायसेस, खरुज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. पानांच्या भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात.
तांदुळजातांदुळजाही भाजी 'क' जीवनसत्वाचा मोठा खजिना आहे. त्वचा उजळते, तापात उपयुक्त, विष नाशक, मुळव्याधावर गुणकारी, यकृत मजबूत करते.
पाथरीकमी पर्जन्यमान असलेल्या पठारावर, माळरानावर सर्वत्र उपलब्ध, करडईच्या पानासारखी दिसते. कफनाशक, स्तनदा मातांना, अशक्त व्यक्तींना उपयोग.
कुरडूमुतखडा या आजारावर गुणकारी. सलग आठ दहा-दिवस जेवणात वाटीभर खाल्यास मुतखडा विरघळवते. लघवी जास्त प्रमाणात होते. किडनी साफ करते.