अस्सल हापूस ओळखण्यासाठी ५ टीप्स

बाजारात हापूस आंबा घेताना वापरा 'या' महत्त्वाच्या टीप्स

सुगंध
खऱ्या हापूसचा सुगंध अतिशय गोड आणि नैसर्गिक असतो. देठाजवळ नाकाला लावून वास घेतल्यास तो दरवळतो.

आकार आणि साल
हापूस आंबा अंडाकृती आणि खालच्या बाजूला थोडा फुगीर असतो. त्याची साल अतिशय पातळ आणि मऊ असते.

रंग
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या हापूसचा रंग पिवळसर आणि हलका हिरवा असतो.

स्पर्श
खरा हापूस हातात घेतल्यावर मऊ आणि नरम लागतो, तर रासायनिक आंबे कडक असतात.

पाण्याची चाचणी
आंबा घरी आणल्यावर एका भांड्यात पाण्यात बुडवून ठेवावा. आंबा पाण्यात बुडाला, तर तो नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे.

Click Here