पांढरा कांदा हा पोषणमूल्यांनी समृद्ध असून तो औषधी गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.
पांढऱ्या कांद्यामध्ये फायबर आणि प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांतील चांगल्या जिवाणूंची वाढ करून पचन सुधारतात.
कांद्यातील सल्फर कंपाऊंड्स आणि फ्लॅवोनॉइड्स रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. कोलेस्टेरॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतात.
व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. सर्दी, खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते.
डायबेटिस असलेल्या लोकांसाठी पांढरा कांदा उपयुक्त आहे कारण तो इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतो. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो.
यातील अँटिऑक्सिडंट्स आणि सल्फरमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ चांगली होते.