तुळस ही वनस्पती व्हिटामिन सी आणि जस्त यासारख्या खनिजांनी समृद्ध असते.
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
अगदी शतकानुशतके सर्दी-खोकला, ताप यासारख्या समस्यांच्या उपचारासाठी औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो.
तुळशीमध्ये असणारी कॅम्फेन, सिनेओल, युजेनॉल यासारखी संयुगे छातीत साठून राहिलेला रक्तसंचय, खोकला दूर करण्यास मदत करतात.
तुळशीमध्ये त्वचेची काळजी घेणारा अँटिऑक्सिडंट सारखा गुणधर्म असल्यामुळे फेस क्रीम, सिरम स्किनकेअर उत्पादनांमध्ये तुळशीचा वापर केला जातो.
तुळशीला किडनी स्टोनसाठीचा नैसर्गिक उपाय म्हणूनही ओळखले जाते. कारण ते शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करते.