अळंबी खाण्याचे फायदे

पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकप्रिय रानभाजी आहे. आता अळंबीची व्यावसायिक शेती सुद्धा केली जाते.

अळंबीमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट, प्रथिने, व्हिटॅमिन डी, सेलेनियम आणि झिंक असते. प्रोटेस्ट व स्तनाच्या कर्करोगामध्ये ते गुणकारी असते.

अळंबी उकळून रोज नाश्त्यामध्ये खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

मधुमेहींसाठी रक्तातील साखर नियंत्रित राखण्यासाठी उपयोग होतो.

यातील सेलेनियममुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदयरोगासाठी याचे सेवन उपयुक्त आहे. गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या आजारात गुणकारी.

अळंबी पाण्याने स्वच्छ धुवून व पुसून घ्यावी. हळद व मिठाच्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवावी व नंतर त्याची भाजी बनवावी.

Click Here