अंजीरामध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
अंजीरामधील खनिजे हाडे मजबूत ठेवतात, रक्तातील हिमोग्लोबिन सुधारतात आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखतात.
हृदयासाठीही अंजीर अत्यंत चांगले मानले जाते. त्यातील तंतू रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात त्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते आणि हृदयावरचा ताण कमी होतो.
अंजीरमध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. अंजिरातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी, फिकट आणि निस्तेज होण्याचा धोका कमी होतो.