बांबूची जंगले विविध प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी अधिवास प्रदान करतात.
बांबू कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर टाकतो. त्यामुळे हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
बांबूची पाने आणि खोड खत म्हणून वापरले जातात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
विविध उद्योगांना चालना यात बांधकाम, फर्निचर, कागद, बायोचार तसेच बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल आणि इतकेच काय डायपरसुद्धा मिळतात.