आता भारतात कॉफीचे उत्पादन मोठे प्रमाणात वाढले आहे.
बाबा बुदन नावाचे एक मुस्लिम साधू (सुफी संत) हे इथिओपियाहून मेकाला हज यात्रा करून परत येत असताना कॉफीच्या सात बिया लपवून भारतात आणल्या.
त्या काळी अरब देशांमध्ये कॉफीच्या बियांना बाहेर नेण्यास बंदी होती.
त्यांनी त्या बिया कर्नाटकमधील चिकमंगलूर जिल्ह्यातील बाबा बुदन गिरी पर्वतात लावल्या.
हळूहळू त्या भागात आणि नंतर दक्षिण भारतात कॉफीची लागवड सुरू झाली.
हेच ठिकाण भारतीय कॉफी उत्पादनाचे उगमस्थान मानले जाते.
आजही बाबा बुदन गिरी हे ठिकाण "भारतीय कॉफीचे जन्मस्थान" म्हणून ओळखले जाते.
भारतात प्रामुख्याने कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तरपूर्व भारतात कॉफीचे उत्पादन होते.
कर्नाटकात सुमारे 70% उत्पादन करते.
भारत मुख्यतः 'अरेबिका' आणि 'रोबस्टा' या दोन प्रकारच्या कॉफीची शेती करतो.