शेतकऱ्यांशी साधला बांधावर संवाद
राज्यपाल आचार्य देवव्रत हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते.
या दौऱ्यात त्यांनी दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत नैसर्गिक शेतीचे महत्व सांगितले.
जमीन सुपीक करावयाची असेल, तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल. - राज्यपाल आचार्य देवव्रत
प्रारंभी राज्यपाल देवव्रत यांनी श्रमदान करीत चाऱ्याची कापणी केली.
हा चारा येथील शेतकऱ्याच्या गाय आणि कालवडीला खाऊ घातला. त्यानंतर गायींची माहिती घेतली.
राज्यपाल देवव्रत यांनी स्वतः जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविले.
प्रत्येक शेतकऱ्यांने गो पालन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.