७५ दिवसांत लाखोंचं उत्पन्न देणारी ग्लॅडिओलस फुलशेती
कमी कालावधीत अधिक उत्पन्न
मोगरा, गुलाब, सोनचाफा, तसेच ऑर्किडप्रमाणेच ग्लॅडिओलस फुलशेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
ग्लॅडिओलस हे व्यापारी फूल पीक असून, दांड्यावर आकर्षक फुले येतात.
अनेक रंगछटा, गुच्छ तयार करणे आणि सजावटीसाठी या फुलांना वर्षभर मागणी असते.
या रब्बी हंगामातील पिकाला कडक उन्हाळा आणि जोरदार पाऊस वगळता वर्षभर लागवड करता येते.
फुलांच्या आकर्षक रंगासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस थंड तापमान, कोरडे व कमी पावसाचे हवामान अनुकूल असते.
संसरे (पांढरा रंग), यलोस्टोन (पिवळा), ट्रॉपीकसीस (निळा), फुले गणेश (फिका पिवळा), फुले प्रेरणा (फिका गुलाबी), नजराणा (गर्द गुलाबी), पुसा सुहागन (लाल), हंटिंग साँग (केशरी) या फुलांना मागणी आहे.
योग्य व्यवस्थापनातून प्रतिहेक्टर दीड लाख ते अडीच लाख फुलदांडे मिळतात.
१२ फुलदांड्यांची जुडी बांधून बाजारपेठेत पाठवतात. एका फुलदांडीला १२ ते १५ रुपये मिळतात.