जाहीर झाल्यास याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?
ओला दुष्काळ म्हणजे काय?ओला दुष्काळ म्हणजे पाऊस पडतो तरीही पिकांना फायदा होत नाही, उलट नुकसान होते.
कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळ मधील फरक काय?
कोरडा दुष्काळ म्हणजे कमी किंवा अजिबात पाऊस न पडल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणे
ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीमुळे किंवा जास्त पावसामुळे पूर येऊन पिकांची हानी होणे व पर्यावरणाचे नुकसान होणे.
जाहीर करण्याचे निकष काय?पर्जन्यमान, पिकांचे नुकसान, जमिनीतील ओलावा, हवामान व स्थानिक परिस्थिती, सरकारी मूल्यांकन
शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो?पिके पिवळी पडणे व सडणे, उत्पादन खर्च वाया जाणे, उत्पन्न कमी होणे, कर्जमाफी व नुकसान भरपाईसाठी मागण्या
शेतकऱ्यांना काय फायदा होतो?पीक विमा / आपत्ती मदतकर्जमाफी / कर्ज फेडायला मुदतवाढमहसूल वसुली थांबवली जाते.
ओला दुष्काळ हा सततचा पाऊस व पाण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे होणारी नैसर्गिक आपत्ती आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो