Join us

Weather report: पुढील पाच दिवसाचे हवमान बुलेटिन, राज्यात तापमानात होणार वाढ

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 02, 2024 2:38 PM

कुठे काय देण्यात आलाय अंदाज?

राज्यात मे महिन्यात तापमान अधिक राहणार असून मराठवाडा, विदर्भ विभागात उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होणार आहे. साधारण ५ते ८ दिवस उष्णतेच्या लाटांचा जोर राहणार असून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

दरम्यान, हवामान विभागाने जारी केलेल्या विशेष बुलेटिनमध्ये मध्य महाराष्ट्रात १ मे रोजी सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. तर मराठवाडा व विदर्भात ४० ते ४३ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाल्याचे पहायला मिळाले.

काल सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून पारा ४४ अंशावर गेला होता. त्याखालोखाल जळगाव, अकोला जिल्ह्यात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात हिंगोली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते.

बीड, नांदेड ४२.४, लातूर ४१.५, परभणी ४१.६ तर छत्रपती संभाजीनगर ४०.८ अंशांवर पोहोचले होते. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर येथे ४१ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये ३९.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

टॅग्स :तापमानहवामानवनविभाग