Join us

नागपूर ४४.३ अंश, लातूर ३८, तुमच्या शहरात काय आहे आज तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 14, 2024 1:02 PM

राज्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात पोहोचला असून बहुतांश ठिकाणी ३५ ते ४० पर्यंत तापमानाचा पारा जाऊन पोहोचला आहे.

Temperature: राज्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात पोहोचला असून बहुतांश ठिकाणी ३५ ते ४० पर्यंत तापमानाचा पारा जाऊन पोहोचला आहे. कमाल तापमान वाढत असून नागपूरमध्ये सर्वाधिक ४४.३ अंश कमाल तापमान असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

लातूर जिल्ह्यात ३८.६ अंश तर धाराशिवमध्ये ३९.५ अंश तापमान राहणार आहे.पुण्यात शिवाजीनगर परिसरात आज ३६.४ अंशांची नोंद झाली असून इतर भागांमध्येही ३२ ते ३६ व्या मध्येच तापमान आहे.

सोलापूरमध्ये ३८.१ अंश तर सातारा २८.८ अंशांची नोंद होत आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये ३४.४ अंश तर मालेगावमध्ये ३६.२ अंशांची नोंद झाली.

जळगावात तापमान ३९ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. जालन्यात ३५.७ अंश तापमानाची नोंद होत असून धुळ्यात ३७.९ अंश सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचले आहे.

तुमच्या शहरात आज काय तापमान?

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर35.6१५.९
अहमदनगरकोपरगाव35.5१४.७
अहमदनगरराहुरी35.0१४.७
अकोलाAKOLA_AMFU39.5 
औरंगाबादऔरंगाबाद३७.५१८.७
औरंगाबादAURANGABAD_KVK३४.७१५.५
बीडअंबेजोगाई  
भंडारासाकोली_केव्हीके३७.४१७.३
बुलढाणालोणार३६.६२०.३
धुळेधुळे३७.९१७.८
गोंदियागोंदिया  
हिंगोलीहिंगोली३७.९२०.८
जळगावचोपडा  
जळगावजळगाव३९.४२०.७
जालनाजालना35.720.2
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३६.६19.0
लातूरलातूर३८.६२३.५
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३०.१22.5
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३१.६१७.९
नागपूरनागपूर४१.०१८.४
नागपूरNAGPUR_CITY४४.३१९.२
नागपूरNAGPUR_KVK३८.५१८.१
नांदेडनांदेड३७.६२०.६
नंदुरबारNANDURBAR_KVK३४.८१८.५
नंदुरबारनवापूर  
नाशिककालवण३४.४१४.९
नाशिकमालेगाव३६.२19.0
उस्मानाबादउस्मानाबाद39.5२३.७
उस्मानाबादTULGA_KVK३७.१२२.६
पालघरPALGHAR_KVK३१.४२१.६
परभणीPARBHANI_AMFU३६.९ 
पुणेNIMGIRI_JUNNAR३२.५१६.०
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३६.४१६.३
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३३.२१५.२
पुणेCME_DAPODI३३.८२०.८
पुणेDPS_HADAPSAR_PUNE३६.२१८.८
पुणेINS शिवाजी_लोनावला३२.९१३.५
पुणेKHUTBAV_DAUND35.9१५.८
पुणेलोनिकलभोर_हवेली35.7१३.०
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३४.०१४.९
पुणेNIASM_BARAMATI35.8१७.६
पुणेPASHAN_AWS_LAB35.7१३.६
पुणेराजगुरुनगर३६.७१४.८
पुणेतळेगाव३४.५१५.८
रायगडIIG_MO_ALIBAG३४.११९.८
रायगडकर्जत३७.५१७.७
रत्नागिरीदापोली३४.५१८.०
रत्नागिरीरत्नागिरी  
साताराBGRL_KARAD29.2१६.१
सातारामहाबळेश्वर२८.८१८.०
सातारासातारा३६.९१८.१
सिंधुदुर्गMULDE_AMFU  
सोलापूरMOHOL_KVK३८.११६.५
सोलापूरसोलापूर २२.९
वर्धावर्धा २१.९
वाशिमWASHIM_KVK 22.2

 

टॅग्स :तापमानहवामान