Join us

Farmer Women Success Story : दीप्तीताईंचा प्रेरणादायी प्रवास: लाखो शेतकरी महिलांना आशेचा प्रकाश वाचा सविस्तर

By प्रतीक्षा परिचारक | Updated: September 23, 2025 13:10 IST

Farmer Women Success Story : जशी नवरात्रीत देवीची शक्ती अंधकारावर विजय मिळवते, तशीच प्रा. डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी अपंगत्वावर मात करून शिक्षण आणि सेवा यामध्ये विजयी होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात उजेड पसरवला. वाचा त्यांची प्रेरणादायी यशकथा (Farmer Women Success Story)

जशी नवरात्रीत देवीची शक्ती अंधकारावर विजय मिळवते, तशीच प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी अपंगत्वावर मात करून शिक्षण आणि सेवा यामध्ये विजयी होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात उजेड पसरवला.

बालपणापासून आलेल्या अपंगत्वावर मात करत, कृषी शिक्षण घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. दीप्ती पाटगावकर यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे. (Farmer Women Success Story)

माहेरी आणि सासरी शेती नसतानाही त्यांनी महिलांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भागात केलेले कार्य कौतुकास्पद आहे.(Farmer Women Success Story)

मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्यभर कार्यरत असलेल्या डॉ. दीप्ती चिंतामणी पाटगावकर या कृषी क्षेत्रातील एक मान्यवर शास्त्रज्ञ, केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक आहेत. (Farmer Women Success Story)

त्यांनी आपल्या कारकिर्दीत ग्रामीण महिलांना उद्योजकतेकडे वळवून स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.(Farmer Women Success Story)

अन् अपंगत्वावर केली मात

मुळच्या बिहार राज्यातील पटना मोकामा येथे ७ ऑक्टोबर १९७२ रोजी जन्मलेल्या दीप्तीताई बालपणापासूनच जन्मजात अपंग होत्या. 

पायांचे आणि हातांचे काही अविकसित अवयव असल्यामुळे शाळेत किंवा सामान्य जीवनात अनेक अडचणी त्यांना आल्या. मात्र, त्यांच्या कुटुंबाने खंत न व्यक्त करता त्यांचा योग्य सांभाळ केला. त्यांच्या आजीने त्यांचा जन्म आनंदोत्सवासारखा साजरा केला आणि त्यांना लक्ष्मीचे रूप मानले.

बालपणातील या आव्हानांवर मात करत त्यांनी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली. बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कृषी शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा निर्धार केला. 

सुरुवातीला वय कमी असल्याने प्रवेश नाकारला गेला, मात्र त्यांचा निर्धार आणि कौटुंबिक पाठिंबा यामुळे शेवटी राजेंद्र प्रसाद कृषी विद्यालय, पूसा येथे त्यांनी प्रवेश मिळवला.आणि त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला.

शैक्षणिक वाटचाल

दीप्तीताईंनी वर्ष १९९० मध्ये बी.एस्सी. होम सायन्स मध्ये प्रवेश घेतला आणि १९९५ मध्ये एम.एस्सी. बालसंगोपन व कौटुंबिक नाते पूर्ण केले. 

शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महिला, शेतकरी व ग्रामीण समाजासाठी कार्य करण्याची तयारी दर्शवली.

भूकंपग्रस्त लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे १९९५ मध्ये सुरू झालेल्या प्रशिक्षण योजनेत त्यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले. 

प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासोबत, मानसिक आधार देण्याचे कार्यही त्यांनी मोठ्या प्रेमाने केले. या अनुभवाने त्यांच्या नेतृत्वक्षमता आणि सामाजिक संवेदनशीलता वाढवली.

कृषी क्षेत्रातील कार्य

KVK, कोल्हापूर (१९९६ – २००७)

२०,००० पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण

SHG (स्वयं-सहायता गट) उभारणी व व्यवस्थापन

कृषिपूरक उद्योगात २५ महिला व १० पुरुष उद्योजक घडवले

KVK, औरंगाबाद-I (१४ वर्षे)

महिलांचे कष्ट कमी करणारे तंत्रज्ञान गावागावात पोहोचवले

पोषण बाग, गांडूळखत, फळभाजी मूल्यवर्धन अशा संकल्पना रुजवल्या

KVK, खामगाव, बीड

भरडधान्य प्रसार मोहिमेत ५०० कुटुंबांना जोडले

१५ महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योजक बनवले – आज त्या दरमहा ३० ते ५० हजार रुपये कमावतात

KVK, छत्रपती संभाजीनगर (सध्याचे कार्य)

वरिष्ठ शास्त्रज्ञ व कार्यक्रम सन्मवय म्हणून कार्यरत

हवामान प्रकल्प, CFLD, NICRA, FSN असे अनेक राष्ट्रीय प्रकल्प हाताळले

पोषण बाग, कस्टम हार्वेस्टिंग सेंटर, डाळ मिल अशा सुविधा उभारल्या

दीप्तीताईंच्या या कार्यामुळे कृषी विज्ञान केंद्राला गेल्या पाच वर्षांमध्ये ‘ए ग्रेड’ मिळाले. त्यांच्या कार्याची कौतुकाची थाप तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केली आणि त्यांचा गौरव केला.

कौटुंबिक पाठिंबा

फेब्रुवारी २००१ मध्ये चिंतामणी पाटगावकर यांच्याशी विवाह झाला. त्यांच्या पतीनी नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे कुटुंब आणि कार्य व्यवस्थापन सुलभ झाले. त्यांना एक पार्थ नावाचा मुलगा आहे.

वेळोवेळी केले मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर येथे कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक या पदावर त्या सध्या कार्यरत आहेत.

हवामान प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी

महिला बचत गटांना आर्थिक आणि प्रशिक्षण सहाय्य

प्रक्रिया उद्योगातील प्रशिक्षित महिला व पुरुष उद्योजक

‘ए ग्रेड’ मिळवलेले कृषी विज्ञान केंद्र

त्यांच्या कार्याचा झाला गौरव

डॉ. पाटगावकर यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे 

भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार (२०२४)

सर्वोत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ पुरस्कार (२०२२, २०२१, २०१८)

AgroWorld व Agrocare Agri Festival राष्ट्रीय गौरव

GRISSA-2019 राष्ट्रीय स्तरावरील Excellence in Extension Award यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

सामाजिक कार्यातील योगदान

लाखो महिलांना त्यांनी विविध उपक्रमांद्वारे मार्गदर्शन केले.

अनेक महिला उद्योजिकांना प्रशिक्षण देऊन उद्योग उभारणीसाठी सक्षम केले.

बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी उत्पादक संघटनांची स्थापना करून १,४०० पेक्षा अधिक शेतकरी व शेतमजूर महिला स्वयंपूर्ण केल्या.

शेवया, मसाले, पापड, डेअरी यांसारख्या उद्योगांद्वारे ग्रामीण भागात आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग उघडले.

बालपणापासून आलेल्या अपंगत्वावर मात करून, शिक्षण, नेतृत्व आणि सामाजिक कार्याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहे. ही यशकथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते.

डॉ. दीप्ती चिंतामणी पाटगावकर यांचे कार्य केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना 'शेतातून थेट स्वावलंबनाकडे' घेऊन जाण्याचा अद्वितीय प्रयत्न केला आहे. महिला सक्षमीकरण, पोषण सुरक्षा आणि शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने त्यांचे योगदान मार्गदर्शक ठरले आहे.

माझ्यासाठी माझ्या कार्याची सर्वात मोठी पावती म्हणजे शेतकरी आणि महिला समाजाच्या जीवनात बदल आणणे. त्यांच्या यशातच माझे यश आहे.- प्रा. डॉ. दीप्ती पाटगावकर, कार्यक्रम सन्मवय, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : रानभाजीची क्रांती: सुमनबाईंच्या 'कर्टुले' लागवडीने दिला शेतकऱ्यांना नवा मार्ग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजागर "ती"चाशेतकरी यशोगाथाशारदीय नवरात्रोत्सव २०२५