Join us

शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत, कृषी विभागाचं आवाहन 

By गोकुळ पवार | Published: December 02, 2023 3:03 PM

Nashik : एकात्मिक फलोत्पादन विकास योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 वर्षात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ...

Nashik : एकात्मिक फलोत्पादन विकास योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 वर्षात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह, शेडनेटगृह, फलोत्पादन यांत्रिकीकरण, सामुहिक शेततळे, अहिल्याबाई होळकर रोपवाटिका, द्राक्ष प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञान अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या http://mahadbtmahait.gov.in या संकेस्थळावर अर्ज सादर करावेत, असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

दरम्यान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करतांना स्वत:च्या मालकीचा 7/12, 8 अ, आधार कार्ड, बँक पासबुक व जातीचा दाखला अर्जासोबत संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर स्वत:ची नोंदणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी व CSC केंद्रावर  संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.

ठिबक/ तुषार सूक्ष्म सिंचन योजना 

नाशिक जिल्ह्यात 2023-24 या वर्षात आर.के.व्ही.वाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पिक) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थींना मार्गदर्शक सूचनेनुसार 55 टक्के व बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. त्याचप्रमाणे  मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत अतिरीक्त 25 टक्के व 30 टक्के पूरक अनुदान देण्याची तरतूद आहे. यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या http://mahadbtmahait.gov.in या संकेस्थळावर अर्ज सादर करावेत. असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करतांना स्वत:च्या मालकीचा 7/12, 8 अ, आधार कार्ड, बँक पासबुक व जातीचा दाखला अर्जासोबत संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर स्वत:ची नोंदणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी व CSC केंद्रावर  संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :शेतीनाशिकशेती क्षेत्र