Join us

Wheat Market Today: पुण्यात शरबतीच! राज्यात कोणत्या गव्हाला कसा मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 27, 2024 3:42 PM

शरबती गव्हाची बहुतांश बाजारपेठेत आवक, काय मिळतोय भाव?

Wheat Market today: राज्यात पुणे बाजारसमितीत शरबती गव्हाला मागील १५ दिवसांपासून सर्वाधिक दर मिळत असून आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३९१ क्विंटल गव्हाची आवक होत आहे. शरबती गव्हाला ५००० रुपयांचा भाव मिळत आहे. इतर बाजारसमितींमध्येही शरबती गव्हासह लोकल, २१८९ गव्हाची आवक होत असून मिळणारा दर २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

नागपूरात आज सर्वाधिक होतेय आवक

नागपूरात आज सर्वाधिक गव्हाची आवक होत असून १००० क्विंटल शरबती गहू तर ५०९ क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. यावेळी शरबती गव्हाला क्विंटलमागे मिळणारा भाव ३४०० रुपये एवढा आहे. तर लोकल गव्हाला २७६५ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

ठाण्यात ६५३ क्विंटलची आवक

आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत ठाण्यात ३ क्विंटल शरबती तर ६५० क्विंटल लोकल गव्हाची आवक होत आहे. यावेळी सर्वसाधारण ३००० ते ३४०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत असल्याचे पणन विभागाने नोंदवले.

वाचा कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय गव्हाला भाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/05/2024
अहमदनगर२१८९69250027002500
अमरावतीलोकल474245028002625
बुलढाणालोकल32180028512325
छत्रपती संभाजीनगरलोकल35235025302425
धुळेलोकल57201031702900
जळगावलोकल300245027652765
नागपूरलोकल509220026182514
नागपूरशरबती1000310035003400
नाशिक२१८९7262628002800
पालघर---60304530453045
परभणीलोकल27240028002500
पुणेशरबती391400060005000
सोलापूरलोकल10270034003210
सोलापूरशरबती911259039453150
ठाणेलोकल650320036003400
ठाणेशरबती3280032003000
यवतमाळलोकल55234528002530
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4590

टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्ड