Join us

Tur Market:धाराशिवच्या गज्जर तुरीसह इथे आज सर्वाधिक भाव, कुठे कशी आवक? जाणून घ्या..

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 27, 2024 4:24 PM

आज राज्यात ६९७२ क्विंटल तूरीची आवक झाली.

राज्यात सध्या तूरीच्या दरात चढउतार पहायला मिळत असून आज बहुतांश बाजारसमितीत लाल, पांढऱ्या व गज्जर तुरीची आवक झाली. आवक मंदावली असून बहुतांश बाजारसमितींमध्ये तुरीला क्विंटलमागे १० ते १२ हजाररुपयांचा भाव मिळत आहे. आज राज्यात ६९७२ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी मिळणारा भाव ९००० ते ११९०० हजारांपर्यंत होता.

नागपूर, अमरावती, धाराशिवमध्ये सर्वाधिक भाव

आज नागपूर बाजारसमितीत १२ हजार ४६३ सर्वसाधारण भाव मिळत आहे. आज लोकल व लाल तूरीची येथे आवक झाली. अमरावती बाजारसमितीत सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली. यावेळी मिळणार भाव ११९५० रुपये होता. धाराशिवमध्ये २ क्विंटल गज्जर तुरीलाही ११९२५ रुपयांचाच सर्वसाधारण भाव मिळाला.

वाशिम, यवतमाळ बाजारसमितीत..

वाशिम व यवतमाळ बाजारसमितीत लाल तूरीची आवक होत असून क्विंटलमागे साधारण ११६०० ते ११८०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. लातूरमध्ये लाल तूरीला सर्वाधिक १२ हजार रुपयांचा भाव मिळाला. अमरावती बजारसमितीत आज सर्वाधिक आवक झाली असून २५५९ क्विंटल तूरीला मिळणारा सर्वसाधारण भाव ११ हजार ९५० रुपये एवढा होता.

कुठल्या बाजारसमितीत तुरीला काय बाजारभाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/05/2024
अहमदनगरपांढरा2110001100011000
अमरावतीलाल3624117001220011950
बुलढाणालाल9595001220010850
बुलढाणापांढरा3910099009900
छत्रपती संभाजीनगरपांढरा39751100019876
धाराशिवगज्जर2119251192511925
धुळेलाल67900103009600
हिंगोलीलाल53111001200011550
जळगावलाल1095001050010500
लातूरलोकल77251001210010648
लातूरलाल102108001150011221
नागपूरलोकल50111001226011800
नागपूरलाल797110001295112463
नाशिकलाल1169001110110850
नाशिकपांढरा1102051020510205
परभणीलाल12106001100010600
परभणीपांढरा35105001141111200
सोलापूरलाल493105331130010917
वाशिम---800103001205011600
यवतमाळलाल101117651208811880
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6972

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड