Join us

Tur Market: बहुतांश बाजारसमितींमध्ये तुरीला क्विंटलमागे चांगला दर, क्विंटलमागे..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 4:04 PM

पहा तुमच्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव

राज्यात सध्या तूरीची आवक मंदावली असून बहुतांश बाजारसमितींमध्ये तुरीला क्विंटलमागे १० ते १२ हजाररुपयांचा भाव मिळत आहे. इतर शेतमालाला मिळणाऱ्या भावपेक्षा तुरीला चांगला भाव मिळत असल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून दिसून येत आहे. दरम्यान आज राज्यात ६७७७ क्विंटल तूरीची आवक झाली.

आज लाल तूरीसह पांढरी, गज्जर तूर बाजारपेठेत विक्रीकरता दाखल झाली होती. यावेळी क्विंटलमागे शेतकऱ्यांना १० ते १२१०० रुपयांचा भाव मिळत आहे. आज लातूरमध्ये तुरीला सकाळच्या सत्रात ११९५० रुपयांचा दर मिळाला. तर नागपूर, परभणी, धाराशिवमध्येही क्विंटलमागे मिळणारा दर ११ हजारांहून अधिक होता.

राज्यात सर्वाधिक आवक नागपूर बाजारसमितीत झाली. ५६६ क्विंटलची आवक झाली असून क्विंटलमागे ११ हजार ८५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. लाल तूरीला बहुतांश ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत असल्याचे दिसून येत आहे.

कुठल्या बाजारसमितीत तुरीला काय बाजारभाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतीआवककमी दरकर्मचारी जास्त दरमूल्य दर
22/05/2024
बुलढाणालाल४२९६८३३11600१०७१७
छत्रपती संभाजीनगर----6११२२१११२२१११२२१
धाराशिवगज्जर२४१116001182211711
धुळेलाल1010000१०८३५10100
हिंगोलीलाल५९१०६००1180011200
जळगावलाल20८८००11000१०२५१
जालनापंढरी38000१०३५०10000
लातूरलाल२५110001200011500
लातूरपंढरी३४11800१२१००11950
नागपूरलाल५६६10500१२३००11850
नांदेडलाल890001100010000
नाशिकलाल२८700011120१०८२५
परभणीलाल३८110001100011000
सोलापूरलाल३७११०२७५1188311430
वर्धालाल30११६२५0
येवतमाळलाल६५११२५५१२३००11750
राज्य एकूण आवक (Qtl.)1906

टॅग्स :तूरबाजार