Join us

Soybean Market Today: एकाच बाजारसमितीत साेयाबीनला आधारभूत भाव, लातूर, धाराशिवसह उर्वरित ठिकणी काय स्थिती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 22, 2024 3:37 PM

सर्वाधिक साेयाबीनची आवक या बाजारसमितीत, दर काय मिळतोय?

राज्यात सध्या सोयाबीनची आवक होत असून शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी पुन्हा काढला आहे. आज राज्यात दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५हजार ४६५ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. वाशिम बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक हाेत असून तर धाराशिवमध्ये पिवळ्या सोयाबीनला शेतकऱ्यांना ४475 रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. तर लातूरमध्ये ४५३० रुपयाचा सर्वसाधारण भाव मिळाला.

परभणी बाजारसमितीत साेयाबीनला आधारभूत किंमत मिळाली असून इथे केवळ ६५ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला भाव मिळत नसल्याने आवकही मंदावल्याचे समोर येत आहे.अजूनही साेयाबीनला हमीभाव मिळत नसून ४१०० ते ४६०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/05/2024
अहमदनगर---7410143004200
बुलढाणापिवळा756416044104285
छत्रपती संभाजीनगर---15440044504425
धाराशिव---65447544754475
हिंगोलीपिवळा66420044004300
जालनापिवळा48441045304500
लातूरपिवळा221450045604530
नागपूरलोकल431410044024327
नांदेडनं. १2430047004500
नाशिकपिवळा39425045304530
परभणीपिवळा65460146014601
वर्धापिवळा160405043504150
वाशिमपिवळा3000435045654450
यवतमाळपिवळा590439244754432
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5465

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड