Join us

Sorghum Market today: राज्यात आज शाळूसह, मालदांडी, दादर ज्वारीची आवक, काय मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 27, 2024 2:45 PM

पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या बाजारसमितीत मालदांडीला अधिक भाव

राज्यात आज सकाळच्या सत्रात शाळूसह मालदांडी, दादर ज्वारीची आवक होत असून दुपारी २.१५ पर्यंत ११२४ क्विंटल ज्वारी विक्रीसाठी दाखल झाली आहे. पुण्यात सकाळच्या सत्रात सर्वज्ञधिक ६९४ क्विंटल मालदांडी ज्वारीची आवक झाली. यावेळी क्विंटलमागे शेतकऱ्यांना ५१५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

धाराशिवमध्ये आज पांढरी ज्वारी दाखल होत असून १४२ क्विंटल आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना क्विंटलमागे ३५५६ रुपयांचा भाव मिळाला. पुणे व धाराशिव या दोन बाजारसमितीशिवाय इतर ठिकाणी ज्वारीला सर्वसाधारण १८०० ते २५०० रुपयांचा भाव सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यातही मालदांडी ज्वारीची आवक होत असली तरी पुणे बाजारसमितीच्या तुलनेत मिळणारा दर निम्मा असल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून समजते. शेतकऱ्यांना क्विंटलमागे २८०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

जळगाव बाजारसमितीत दादर जातीच्या ज्वारीची आज आवक होत आहे. १७ क्विंटल ज्वारीला शेतकऱ्यांना मिळणारा भाव २५०० रुपयांचा होता. विदर्भात लाकल व हायब्रीड ज्वारीची आवक होत असून मिळणारा भाव १८०० ते २२०० रुपयांदरम्यान आहे.

टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्ड