Join us

सकाळच्या सत्रात नागपूरमध्ये सर्वाधिक लाल तूरीची आवक, मिळतोय असा बाजारभाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 16, 2024 2:56 PM

आज मंगळवार दि १६ एप्रिल रोजी ८ हजार ९२ क्विंटल तूर बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. 

सध्या राज्यात तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव १२ हजारापर्यंत जात आहे. आज मंगळवार दि १६ एप्रिल रोजी ८ हजार ९२ क्विंटल तूरबाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. मागील चार दिवसांपासून मिळत असलेल्या भावाच्या तूलनेत आज तूरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरु आहे.

नागपूर बाजारसमितीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण १११८८ ते ११७५० रुपयांचा भाव मिळाला. 

विदर्भातून तूरीची सध्या सर्वाधिक आवक होत असून आज वाशिम,अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यातून लाल व पांढऱ्या जातीच्या तूरीला चांगला भाव मिळत आहे.विदर्भातून आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढला आहे..

सकाळच्या सत्रात आज अशी होती आवक

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/04/2024
अमरावतीलाल4086107001175011225
बुलढाणापांढरा2950096009500
छत्रपती संभाजीनगर---1399001035210100
धाराशिवलाल10100001100010500
धाराशिवपांढरा16100001100010500
हिंगोलीलाल65105001090010700
जालनालाल4784001070010100
जालनापांढरा1485001050010000
नागपूरलाल200995001175011188
परभणीपांढरा257796106269600
वर्धालाल3598501126010950
वाशिम---171099001137810850
यवतमाळलाल60900095009300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8092
टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड