Join us

हरभरा बाजारभाव: सकाळच्या सत्रात जळगावात काबुली चण्याला सर्वाधिक भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 25, 2024 1:48 PM

आज राज्यात ३३५३ क्विंटल हरभऱ्याची आवक,काय मिळतोय बाजारभाव?

राज्यात आज सकाळच्या सत्रात ३ हजार ३५३ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी जळगावात काबुली चण्याला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे ७७९० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज सकाळच्या जळगाव बाजारसमितीत नं १, चाफा आणि काबुली चण्याची आवक झाली. अमरावती बाजारसमितीत २ हजार ८५४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यात सर्वसाधारण भाव ६६५० रुपयांचा भाव मिळत आहे.

जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळत आहे. आज राज्यात विविध बाजारसमितीत लाल, गरडा, काट्या, काबुली चण्यासह लोकल हरभऱ्याची आवक झाली होती. आज लातूर बाजारसमितीत सर्वाधिक लाल हरभऱ्याची आवक होत असून दुपारी ५ वाजेपर्यंत ५ हजार २७० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती.

आज पुण्यात ४३ क्विंटल हरभऱ्याला ७०५० रुपयांचा भाव मिळाला. यवतमाळ जिल्ह्यात ५४५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळला.

कोणत्या हरभऱ्याला कुठे कसा भाव मिळाला? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/05/2024
अमरावतीलोकल2854630070006650
हिंगोलीलाल50620066006400
जळगावनं. १5760076007600
जळगावचाफा32610062506250
जळगावकाबुली9779077907790
पुणे---43650076007050
यवतमाळलाल360540055005450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3353

टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड