Join us

या बाजारसमितीत गज्जर तूर चमकली, सकाळच्या सत्रात मिळतोय एवढा दर

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 01, 2024 4:13 PM

सकाळच्या सत्रात राज्यात एकूण १४५ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.

राज्यात सध्या तूरीचा चांगला भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात राज्यात एकूण १४५ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. शनिवार रविवारच्या दोन दिवसांनंतर आज सकाळी तूरीची आवक घटली होती.

धाराशिवच्या गज्जर जातीच्या तूरीला आज सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे १० हजार ३३६ रुपयांचा भाव मिळत आहे. हिंगोलीच्या लाल तूरीला ९९५० रुपयांचा दर मिळाला.

जालन्यात ११ क्विंटल पांढऱ्या तूरीची ८३०० सर्वसाधारण भाव मिळाला. परभणीच्या लाल तूरीला ९५५१ रुपयांचा भाव मिळाला. या बाजारसमितीत ५० क्विंटल तूरीची आवक  झाली होती.

शेतमाल: तूर

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/04/2024
बुलढाणापांढराक्विंटल11700082007500
धाराशिवगज्जरक्विंटल24102511042110336
हिंगोलीलालक्विंटल499500104009950
जालनापांढराक्विंटल11785187978300
परभणीलालक्विंटल50955195519551
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)145
टॅग्स :बाजारपुणेतूर