Join us

सोयाबीनला हमीभाव मिळतोय का? आवक, बाजारभाव पहा एका क्लिकवर

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 24, 2024 2:53 PM

Soybean market today: पणन विभागाच्या माहितीनुसार सकाळच्या सत्रात सोयाबीनला क्विंटलमागे...

राज्यात मागील महिनाभरापासून सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत असून  हमीभावाहून शेतकऱ्यांची ओरड सुरु आहे. पणन विभागाच्या माहितीनुसार आज राज्यात ६ हजार ३६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे सोयाबीनला ३८०० ते ४६०० रुपयांचा दर मिळत आहे.

सकाळच्या सत्रात  लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला ४५४८ रुपयांचा भाव मिळाला. लातूर बाजारसमितीत १०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. केंद्राने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतींनुसार पिवळ्या सोयाबीनला ४६०० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला होता.

आज अमरावती बाजारसमितीमध्ये राज्यात सर्वाधिक ३६९४ क्विंटल लोकल प्रतिच्या सोयाबीनची आवक झाली. प्रतिक्विंटल सोयाबीनला मिळणारा साधारण दर ४५०० रुपये होता.  यावेळी शेतकऱ्यांना कमीत कमी ४४५० रुपये तर ४५०० रुपये जास्तीत जास्त भाव मिळाला.

धाराशिवमध्ये आज ६१ क्विंटल सोयाबीनला प्रतिक्विंटल ४५०० रुपये भाव मिळाला असून हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४३२९ रुपये सर्वसाधारण भाव मिळाला. आज हिंगोलीत ८७० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

दरम्यान काल दि २४एप्रिल रोजी दिवसाअखेर  १० हजार ६४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. काल सोयाबीनला ४००० ते ४६०० दरम्यान सर्वसाधारण प्रतिक्विंटल दर मिळाला. 

जाणून घ्या सोयाबीनची आवक व दर

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/04/2024
अकोलापिवळा1052400045754390
अमरावतीलोकल3694445045504500
बुलढाणापिवळा460410044334319
बुलढाणापिवळा515460046304610
चंद्रपुरपिवळा46310041003800
धाराशिव---60450045004500
धाराशिवपिवळा1450045004500
हिंगोलीलोकल800410045584329
हिंगोलीपिवळा70425045004375
जालनापिवळा47440046004500
लातूरपिवळा100440145814548
परभणीपिवळा30450046004500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6360
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड