Join us

Budget 2024: शेतकऱ्यांसाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूदी?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: February 1, 2024 12:04 IST

शेतकऱ्यांना शेतमाला योजना राबविण्यात येणार असून शेतमाल टिकून राहावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. 

अर्थसंकल्प २०२४: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी २०२४-२५ च्या बजेटमध्ये गरीब, महिला, तरूण आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले. यंदाचा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय काय तरतूदी करण्यात आल्या?

यावेळी भाषणात निर्मला सितारमन म्हणाल्या, शेतकरी हा अन्नदाता आहे. दरवर्षी पीएम किसानमधून ११.८ कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात येतो. ४ कोटी शेतकऱ्यांना फसल बिमा योजनेतून पीक विम्याचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केटने १३६१ बाजारसमित्यांना जोडल्याचेही सांगण्यात आले. कृषी स्टार्ट अप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यास प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हे आहेत महत्वाचे मुद्दे

१. शेतकऱ्यांना शेतमाला योजना राबविण्यात येणार असून शेतमाल टिकून राहावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. 

२.तेलबिया बाबत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील 

३.दूध उद्योगासाठी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या योजना सोडविण्यासाठी विविध योजना राबविणार 

४.राष्ट्रीय गोकुळ मिशन, लाईव्ह स्टॉक मिशन या योजनांना बळ दिले जाणार 

५.पीएम मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन दिले जाणार 

६.पीएम किसान संपदा योजना ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ 

७.विविध किसान योजनांतून ११. ८ कोटी शेतकऱ्यांना लाभ 

८.नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे हवामान बदलात त्याचा वापर परिणामकारक ठरत आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामनशेती क्षेत्र