Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाल्य रेशीम कीटक संगोपन प्रशिक्षणाचा लाभ घ्या

By बिभिषण बागल | Updated: July 22, 2023 15:57 IST

रोजगार युवक, महिला व शेतकयांसाठी "बाल्य रेशीम किटक संगोपन" या विषयावर १० दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन ३ ते १२ ऑगष्ट २०२३ रोजी करण्यात आले आहे.

रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचेमार्फत बाल्य रेशीम किटक संगोपन या विषयीचे १० दिवसीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यातील बेरोजगार युवक, महिला व शेतकयांसाठी "बाल्य रेशीम किटक संगोपन" या विषयावर १० दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन ३ ते १२ ऑगष्ट २०२३ रोजी करण्यात आले असून सर्व जिल्ह्यातून निवडक ३० रेशीम उद्योजक शेतकयांची निवड करण्यात येणार आहे.

सोबत जिल्हा रेशीम कर्यालयाचे तांत्रीक अधिकारी यांना पण प्रशिक्षणात भाग घेता येईल. तरी आपल्या जिल्हयातील होतकरू व प्रगतशिल इच्छूक शेतक यांची व तांत्रिक अधिकारी यांची नावे कळवण्यात यावी. प्रशिक्षण सशुल्क असून नाष्टा, जेवण तसेच राहण्याची व्यवस्था विद्यापीठ शेतकरी भवन येथे करण्यात येईल तथा यशस्वी रेशीम उद्योजक शेतक यांकडे भेटीचा यात समावेश आहे.

संपर्क : श्री. धनंजय मोहोड, वरिष्ठ संशोधन सहाय्यक मो. क्र. ९४०३३९२११९ 

टॅग्स :रेशीमशेतीसरकारपरभणी