Join us

नारायणगाव केविकेला मिळाला वार्षिक क्षेत्रीय कार्यशाळेत सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार

By बिभिषण बागल | Published: August 02, 2023 1:22 PM

शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी केलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उपक्रमांद्वारे साध्य झालेल्या प्रयोगांचे प्रमाण सादरीकरनातून दाखविण्यात आले. यावेळी डॉ शेटे यांनी केव्हिके च्या वतीने केलेले कार्य आणि कृषी विस्तार कार्यात घेतेलेले परिश्रम लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

कृषी तंत्रज्ञान अवलोकन व संशोधन संस्था (आयसीएआर अटारी) पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या वार्षिक विभागीय (झोन ८) तीन दिवसीय कार्यशाळा नुकतीच कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राला (केव्हिके) उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, आयसीएआर अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, CIAH, बिकानेर संचालक डॉ. जगदीश राणे, आयसीएआर अटारी पुणेचे माजी संचालक डॉ लखन सिंग, आयसीएआरचे माजी उपमहानिर्देशक डॉ किरण कोकाटे यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांना प्रदान करण्यात आला.

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार स्वीकारताना वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे

कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील ८२ वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुखांचा सक्रिय सहभाग होता. डॉ शेटे यांनी नारायणगाव केव्हीके च्या माध्यमातून २०२२-२३ या आर्थिक वर्षात केलेल्या कार्याचा इती वृत्तांत आणि केलेल्या प्रशंसनीय कार्याचा प्रगती अहवाल सादर केला. शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी केलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उपक्रमांद्वारे साध्य झालेल्या प्रयोगांचे प्रमाण सादरीकरनातून दाखविण्यात आले. यावेळी डॉ शेटे यांनी केव्हिके च्या वतीने केलेले कार्य आणि कृषी विस्तार कार्यात घेतेलेले परिश्रम लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. 

केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिलतात्या मेहेर म्हणाले की, मिळालेला पुरस्कार कृषी विकासाप्रती असलेली अतूट बांधिलकी आणि शेतकऱ्यांना ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी योगदान देण्याच्या त्यांच्या सततच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. त्यांचे अनुकरणीय कार्य कृषी क्षेत्रातील इतरांसाठी प्रेरणादायी आहे आणि मी त्यांना त्यांच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये सतत यश मिळवून देण्यासाठी शुभेच्छा देतो. 

टॅग्स :शेतीशेतकरीसरकारपीक