Join us

भारतीय इथेनॉलसाठी कशाचा किती वाटा?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 25, 2024 2:55 PM

सरकारने साखर कारखान्यांना हेवी माेलॅसिसचा साठा इथेनॉलमध्ये रुपांतरीत करण्याची परवानगी दिली.

देशातील साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी अन्न मंत्रालयाने साखर कारखान्यांना त्यांच्या ६ लाख ७० हजार टन बी हेवी मोलॅसिसचा साठा इथेनॉलमध्ये रुपांतरीत करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. जाणून घेऊ भारतातील इथेनॉलसाठी कशाचा किती वाटा..

देशाच्या कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल, ९९.९ टक्के शुद्ध अल्कोहोल इंधनात वापरले जाते. भारतातील इथेनॉल प्रामुख्याने उसावर आधारित मोलॅसिस आणि धान्य आधारित स्त्रोतांपासून तयार केले जाते. त्यापैकी बी हेवी मोलॅसेसचा मोठा वाटा आहे.

बी हेवी मोलॅसिसचा साठा नोव्हेंबरमध्ये सुरु झालेल्या आणि चालू वर्षात २.३७ दशलक्ष टन इथेनॉल उत्पादनास समर्थन देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

इथेनॉल उत्पादनाचा वाटा ६० टक्के असून  उसाचा रस २० टक्के आहे. तर सी हेवी मोलॅसेसची किरकोळ भूमिका आहे. एकाबाजूला २०२३-२४ हंगामासाठी साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या ३२.९ दशलक्ष टनांपेक्षा कमी असून यात मासिक घरगुती साखरेचा वापर २.२ ते २.३ दशलक्ष टनांच्या दरम्यान आहे.

किमतीत ३% वाढ

बॉम्बे शुगर मर्चेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलसाठी साखरेचा जास्तीचा कोटा वितरित केला आहे. तरीही सध्या घाऊक ग्राहकांकडून मजबूत मागणी असल्यामुळे साखरेच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

हेही वाचा-

शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट होईल आता वेळेत; केंद्राने घेतला हा मोठा निर्णय

भर उन्हात प्रचार, शीतपेयांना वाढतेय डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर

टॅग्स :साखर कारखानेऊसतेल शुद्धिकरण प्रकल्प