Join us

कोथिंबीर, चिंच, डाळीला जीआय मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 2:02 PM

लातूर जिल्ह्यातील उत्पादनांची आता होणार देशभरात ओळख, जीआय टॅग म्हणजे काय?

कोथिंबीर, पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तूरडाळीला भौगालिक निर्देशांक अर्थात जीआय मानांकन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या उत्पादनाची ओळख देशभरात होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील आशिव येथील कास्ती औसा तालुक्यातील आशिव व परिसरातील २० ते २५ गावांत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कोथिंबिरीचे उत्पादन घेतात. परिसरातील कोथिंबीर इतर कोथिंबिरीच्या तुलनेत अधिक सुगंधित असल्याने बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे कास्ती कोथिंबीर शेतकरी उत्पादक संघाने जीआय मानांकन मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. त्यास यश आले असून, जीआय मानांकन जाहीर करण्यात आले आहे.

पानचिंचोली चिंच आणि बोरसुरी तूरडाळ

निलंगा तालुक्यातील पानचिचोली येथील पातडी चिंच उत्पादक संघाच्या पानचिचोली चिंच आणि बोरसुरी तूरडाळ उत्पादक संघाची बोरसुरी तुर डाळ, आशिव येथील कास्ती कोथिंबीर उत्पादक संघाची कास्ती कोथिंबिरीस भौगोलिक निर्देशांक अर्थात जीआय मानांकन घोषित करण्यात आले आहे. या घोषणेमुळे लातूर जिल्ह्यातील या तीन उत्पादनांना देशभरात ओळख मिळणार आहे.

GI दर्जा म्हणजे काय?

एखाद्या पदार्थाचा दर्जा, स्थान, पत आणि विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये असणारी त्या पदार्थाची विशेष ओळख जपण्यासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थाच्या प्रमाणीकरणासाठी दिला जाणारा दर्जा म्हणजे भौगोलिक संकेत (GI). त्या पदार्थाला देण्यात आलेला दर्जा किंवा चिन्ह त्या भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधित्व करेल.

गोव्याच्या काजूला मिळाला GI दर्जा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांना दारे खूली

GI दर्जा किती वर्षांकरिता वैध असतो?

भौगोलिक संकेत(GI) हा १० वर्षांकरता वैध असतो. दहा वर्षांनंतर हा कालावधी पुन्हा वाढवता येतो.

टॅग्स :लातूरशेती क्षेत्र