Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाळींचा साप्ताहिक साठा जाहीर करण्याच्या केंद्राच्या सूचना, चूकीची माहिती आढळल्यास...

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 11, 2024 14:48 IST

बाजारात होणारी हेराफेरी व साठेबाजी टाळण्यासाठी केंद्राच्या महत्वाच्या सूचना

केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना डाळींचा साप्ताहिक साठा जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जाहीर केलेल्या साठ्याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्राहक मंत्रालयाने जारी केलेल्या निवदनात म्हटले आहे की, ही बैठक सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डाळीच्या साठा जाहीर करण्याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आहे. मोठ्या बंदरांमधील गोदामांमध्ये कडधान्य उद्योग केंद्रांमधील डाळींच्या साठ्याची वेळोवेळी पडताळणी केली जावी आणि स्टॉकहोल्डिंग संस्था तसेच स्टॉक डिस्कोजर पोर्टलवर चुकीची माहिती असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. असे या निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील बाजारांमध्ये होणारी हेराफेरी, साठेबाजी टाळण्यासाठी डाळींच्या किमतींवर तसेच डाळींच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कडधान्य आयातदार संघटना आणि इतर डाळ उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या आभासी बैठकीत डाळींच्या साठ्यासंबधित मुद्द्यांवर चर्चा झाली. 

टॅग्स :पीककेंद्र सरकारशेती क्षेत्र