Join us

३०० प्रजातींचे १ हजार गुलाब! पुणे येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 1:23 PM

पुणे येथे दि रोझ सोसायटी ऑफ पुणे यांच्या १०७ व्या पावसाळी गुलाब प्रदर्शनाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सुरुवात झाली. सोसायटीचे प्रमुख व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शनिवारी याचे उद्घाटन झाले.

यात पुणेकर गुलाबप्रेमी रसिकांना आकर्षक रंगांच्या तब्बल ३०० प्रजातींचे सुमारे १ हजार गुलाब पाहता येतील. रविवारी (दि. ३) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हे प्रदर्शन खुले असणार आहे. ग्लॅडिएटर, ब्लॅक लेडी, डबल डिलाईट, डीप पिंक, ब्ल्यू व्हायलेट आदींसह लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा, ऑरेज रंगांचे गुलाब आहेत. प्रदर्शनस्थळी गुलाबाची रोपे, कीटकनाशके, खते, जंतुनाशके व बागकामाचे साहित्यही उपलब्ध आहे.

चंद्रावर यशस्वी स्वारी केलेल्या व आता थेट सूर्याचा अभ्यास करायला निघालेल्या 'इस्रो' या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा देशातच नव्हे तर जगात बोलबाला आहे. गुलाबांच्या जगानेही याची दखल घेतली. संजय मुखर्जी यांनी संशोधनातून विकसित केलेल्या आपल्या गुलाबाचे नामकरण 'इस्रो' असे केले असून, हाही गुलाब या प्रदर्शनात आहे.

टॅग्स :फुलंपुणेटिळक महाराष्ट्र विद्यापीठइस्रो