Join us

जागतिक मत्स्यपालन दिवस: जागतिक मागणीत भारत मोठा मत्स्य पुरवठादार

By मुक्ता सरदेशमुख | Updated: November 21, 2023 18:30 IST

महाराष्ट्रातील मच्छिमारांना शोभेच्या माशांसाठी जगभरात मागणी

प्राचीन काळापासून माणूस मासेमारी करतो. सागरी संसाधनांवर जगणारा एक मोठा वर्ग जगात आहे. भारत हा त्यात मोठा मत्स्यपुरवठादारही आहे. असे असताना मासेमारांच्या उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी व त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी दरवर्षी २१ नोव्हेंबर हो दिवस जागतिक मत्स्यपालन दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश आहे. जागतिक उत्पादनात ८ टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. मागील वर्षात म्हणजे २०२२-२३ मध्ये मत्स्यपालन आणि मत्स्यपालन उत्पादनांची ८.०९ अब्ज डॉलर किमतीची आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात नोंदवली आहे. वाढत्या जागतिक मागणीत भारत हा प्रमुख मत्स्य पुरवठादार आहे.

मत्स्य योजनेतून मच्छीमारांना देणार किसान क्रेडिट कार्ड

कोणत्या देशांना भारत करतो निर्यात?

  • मासे आणि मत्स्य उत्पादनासाठी भारत प्रामुख्याने पाच भागात मत्स्य निर्यात करतो. अमेरिका, चीन, युरोपीयन युनियन, दक्षिणपूर्व आशिया, जपान आणि मध्य पूर्व भागात भारत मासे निर्यात करतो. 
  • भारताला तब्बल ६ हजार १०० किमीचा सागरी किनारा लाभलाय. त्यात ७२० किमीचा सागरी किनारा महाराष्ट्राला आहे. ज्यामध्ये अनेकांचे उपजीविकेचे साधन मासेमारी आहे. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ७५% मत्स्य उत्पादन अंतर्देशीय मत्स्यव्यवसायातून आणि उर्वरित २५% वाटा सागरी मत्स्यव्यवसायातून दिला गेला. 
  • शोभेच्या मत्स्यव्यवसायासाठी भारताला मोठी मागणी आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, गुजरात, कर्नाटक, आसाम आणि मणिपूर हे राज्य या मत्स्यव्यवसायात आघाडीवर आहेत.

अपरिपक्व मासेमारी, खरेदी-विक्री यावर निर्बंध लावले खरे पण त्याची अंमलबजावणी करायची कशी?

ऐतिहासिक पार्श्चभूमी

जागतिक मत्स्य पालन दिनाची कल्पना सर्वप्रथम जागतिक मत्स्यपालन मंच (WFF) ने 1997 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मांडली होती. जागतिक अन्नसुरक्षेमध्ये मत्स्यपालनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि उद्योगावर परिणाम करणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हा या प्रस्तावाचा उद्देश होता. 

पहिला जागतिक मत्स्य पालन दिन 21 नोव्हेंबर 1997 रोजी साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून, हा एक वार्षिक कार्यक्रम बनला आहे जो जगभरातील सरकारे, संस्था आणि समुदायांना मत्स्यपालन क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्र आणतो.

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देणार

पोषणमूल्यासाठी मत्स्यव्यवसायाकडे जगाचे लक्ष

वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोषण आहाराची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व सागरी संसाधनांवर ताण पडत आहे. प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात मत्स्यपालन क्षेत्र मोठी भूमिका पार पाडते. वाढत्या हवामान बदलांमुळे सागरी जीवांच्या अधिवासावर आधिच गदा आलेली असताना शाश्वत मासेमारीकडे वळवण्याचे जगासमोर मोठे आव्हान आहे.

टॅग्स :मच्छीमारसागरी महामार्ग