Join us

कापूस आणि सोयाबीन क्लस्टरची गरज, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 3:19 PM

अकोला जिल्ह्यात कॉटन व सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी क्लस्टर उभारण्याची गरज आहे.

रवी दामोदर 

अकोला : अकोला जिल्हा व एकूणच पश्चिम वऱ्हाडात कापूससोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निसर्गाच्या अवकृपने बऱ्याचदा या पिकांवर संक्रात येऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात कॉटन व सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी क्लस्टर उभारण्याची गरज आहे.

राज्यातील अन्य परिसरात विविध प्रकारचे क्लस्टर्स असून, त्या धरतीवर अकोला परिसरात स्थानिक पिकांशी संबंधित क्लस्टर नाही. नाशिक व सांगली परिसराकडे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाईन निर्मितीच्या दृष्टिकोनातून क्लस्टरची उभारणी करण्यात आली आहे. येवला येथे हातमागावरील पैठणीचा व्यवसायस जण्यासाठी पैठणी क्लस्टर आकारास आले आहे. 

दरम्यान कॉटन सिटी म्हणून ओळख असलेल्या अकोला परिसरात कापसाशी संबंधित पुरक उद्योगांच्या उभारण्याच्या दृष्टीने किंवा सोयाबीनशी संबंधित क्लस्टर उभारले गेले तर शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकेल. केंद्र शासनाच्या पताळीवर या संदर्भात पाठपुरावा केला जाणे अपेक्षित असून, नवीन खासदाराकडून त्या संदर्भातील अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

अवकाळी पावसाने वेळोवेळी होणारे नुकसान पाहता कापूस पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले तर निसर्गाने होणारे नुकसान टाळून उत्पादन खर्च निघण्याची आशा अधिक आहे.

- भगवान घोगरे, टाकळी खुरेशी ता. बाळापूर.

सोयाबीनची शेती आता परवडणारी राहिलेली नाही. बाजार समितीत सोयाबीन विकण्यापेक्षा तेल उद्योगात किवा अन्य उत्पादनात त्याचा वापर करता आला तर शेतकऱ्यांना फायदा होईल.

- राज्जु नागे, पाचपिंपळ, ता. अकोला.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीसोयाबीनकापूसकॉटन मार्केटअकोला