पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

By नितीन चौधरी | Published: May 13, 2024 12:12 PM2024-05-13T12:12:10+5:302024-05-13T12:14:05+5:30

पुण्यात मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर शिरूर मध्ये अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव तर मावळमध्ये संजोग वाघोरे व श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावला

10 percent polling in second phase in Pune The total voter turnout was 16.16 percent | पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

पुणे : पुणेशिरूरमावळ लोकसभा मतदारसंघात मतदान चुरशीने होत असून नऊ ते 11 या दोन तासांच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास दहा टक्के मतदान झालं असून पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 16.16% मतदान झाले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात हीच स्थिती असून येथे १४.५१% तर मावळ लोकसभा मतदारसंघात 14.87% मतदान झाले आहे.

मतदान करून कार्यालयांमध्ये जाणाऱ्यांची लगबग असल्याने 9 ते 11 या दुसऱ्या टप्प्यात शहरातील तसेच ग्रामीण भागातील बहुतांश मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा दिसून आल्या त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुण्यात सुमारे सहा टक्के तर मावळ मध्ये पाच टक्के व शिरूर मध्ये चार टक्के मतदान झाल्याचे दिसून आले होते मात्र नऊ ते 11 या दुसऱ्या टप्प्यांमध्ये तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सुमारे दहा टक्के मतदान झाले आहे त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये सात ते 11 या काळात 16 टक्के शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 14.51% तर मावळ लोकसभा मतदारसंघात 14.87% मतदान झाले आहे. 

तिन्ही लोकसभा मतदारसंघांमधील प्रमुख उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे पुण्यात मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर शिरूर मध्ये अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव तर मावळमध्ये संजोग वाघोरे व श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात नवं मतदारांसमवेत ज्येष्ठ तसेच मध्यमवयीन मतदारांनी ही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे दुपारनंतर चढणारा उन्हाचा पारा तसेच सायंकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने दुपारी एक पर्यंत मतदानात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

Web Title: 10 percent polling in second phase in Pune The total voter turnout was 16.16 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.