कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 13, 2024 07:33 PM2024-05-13T19:33:59+5:302024-05-13T19:37:14+5:30

या मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, किंवा त्यांच्यासाठी फेरमतदान घ्यावे, अशी मागणी....

Repoll in Karjat Assembly Constituency; Demand of MP Shrirang Barane | कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

पिंपरी : मावळ लोकसभेसाठी सोमवारी मतदान सुरू होते. त्या दरम्यान दुपारी साडेतीन वाजता कर्जत विधानसभा मतदारसंघात जोरदार पाऊस आला. त्यामुळे अनेक मतदार मतदानांपासून वंचित राहिले आहेत. या मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, किंवा त्यांच्यासाठी फेरमतदान घ्यावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र दिले आहे.

बारणे यांनी पत्रात म्हटले की, सोमवारी मतदान सुरू असताना कर्जत विधानसभा मतदारसंघात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना मतदान करता यावे, यासाठी मतदानाची वेळ वाढवून देण्यात यावी. किंवा कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्यावे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.'

Web Title: Repoll in Karjat Assembly Constituency; Demand of MP Shrirang Barane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.