कीर्तिकरांच्या रोड शो मध्ये उध्दव ठाकरेंची उपस्थिती 

By मनोहर कुंभेजकर | Published: May 18, 2024 05:32 PM2024-05-18T17:32:29+5:302024-05-18T17:33:02+5:30

यावेळी उद्धव सेनेने शक्ति प्रदर्शन करत व ‘शिवसेना झिंदाबाद, उध्दव ठाकरे झिंदाबाद’ या गगनभेदी घोषणांनी अंधेरी – जोगेश्वरी परीसर दुमदुमला होता. 

Uddhav Thackeray's presence in Kirtikar's road show | कीर्तिकरांच्या रोड शो मध्ये उध्दव ठाकरेंची उपस्थिती 

कीर्तिकरांच्या रोड शो मध्ये उध्दव ठाकरेंची उपस्थिती 

मुंबई: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या आज दुपारी जोगेश्वरी पूर्व व अंधेरी पूर्व येथील रोड शो व बाईक रॅलीत उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपस्थिती  होती. यावेळी उद्धव सेनेने शक्ति प्रदर्शन करत व ‘शिवसेना झिंदाबाद, उध्दव ठाकरे झिंदाबाद’ या गगनभेदी घोषणांनी अंधेरी – जोगेश्वरी परीसर दुमदुमला होता. 

अंधेरी – कुर्ला रोड सागबाग येथून रोड शोची सुरूवात झाली. सागबाग साई मंदिर वसंत ओअँसीस - तन्वी सुपर मार्केट चौक - डाव्याबाजूने मिलिटरी रोड जंक्शन सेव्हन हिल्स हॉस्पिटल जंक्शन - उजव्या बाजूने विजय नगर ब्रीज - गुडलक जंक्शन डाव्या बाजूने एम आय डि सी पोलिस ठाणे - उद्योग सारथी (नेलको) कनोसा सर्कल ते होली स्पिरीट हॉस्पिटल तक्षीला पूनम नगर जे. व्ही. एल. आर ते गणपती मंदिर - श्याम नगर तलाव ते रामवाडी प्रताप नगर स्मशान भूमी- पश्चिम द्रुतगती मार्ग येथे समाप्त झाला.

शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या  रोड शोत महविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा तसेच युवासेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता. 

शिवसेना नेते व  आमदार सुनिल प्रभू, शिवसेना नेते व आमदार अँड.अनिल परब,आमदार विलास पोतनीस, आमदार  ऋतजा लटके, विधानसभा संघटक प्रमोद सावंत, विधानसभा समन्वयक मनोहर पंचाळ, महिला व पुरुष पदाधिकारी, शिवसैनिक तसेच हजारोंच्या संख्येने जनता या प्रचार फेरीत सहभागी होती.

Web Title: Uddhav Thackeray's presence in Kirtikar's road show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.