जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान
By विजय मुंडे | Published: May 13, 2024 12:54 PM2024-05-13T12:54:49+5:302024-05-13T12:55:18+5:30
सर्वच मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असून, पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
![Queues of voters in Jalna; 21.35 percent polling till 11 am | जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान Queues of voters in Jalna; 21.35 percent polling till 11 am | जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/voting-abd-jalana-a_2024051229915.jpeg)
जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान
जालना : जालना लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान झाले आहे.
जालना लोकसभा मतदार संघातील २०६१ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ पासून मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत ६.८८ टक्के मतदान झाले होते. तर सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान झाले. त्यात जालना विधानसभा मतदार संघात २१.७३ टक्के, बदनापूर विधानसभा मतदार संघात १८.२ टक्के, भोकरदन विधानसभा मतदार संघात २३.८३ टक्के, सिल्लोड विधानसभा मतदार संघात २३.२२ टक्के, फुलंब्री विधानसभा मतदार संघात १९.१ टक्के तर पैठण विधानसभा मतदार संघात २२.२३ टक्के मतदान झाले आहे.
सर्वच मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असून, पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळीही विविध मतदान केंद्रांना भेटी देवून आढावा घेत होते.