मतदान न करताच बोटाला लावली शाई, मतदान कमी करण्यासाठी नगरच्या मतदान केंद्रावर प्रयत्न

By सुदाम देशमुख | Published: May 13, 2024 05:59 PM2024-05-13T17:59:56+5:302024-05-13T18:00:35+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: अहमदनगर येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना मतदान केंद्रात जाऊ न देता त्यांच्या बोटाला शाई लावून त्यांचे मतदान घडवून आणण्याचा प्रकार घडला. या प्रकारावर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आक्षेप घेतला.

Maharashtra Lok Sabha Election 2024:Ink applied to finger without voting, efforts at city polling station to reduce voting | मतदान न करताच बोटाला लावली शाई, मतदान कमी करण्यासाठी नगरच्या मतदान केंद्रावर प्रयत्न

मतदान न करताच बोटाला लावली शाई, मतदान कमी करण्यासाठी नगरच्या मतदान केंद्रावर प्रयत्न

अहमदनगर - येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना मतदान केंद्रात जाऊ न देता त्यांच्या बोटाला शाई लावून त्यांचे मतदान घडवून आणण्याचा प्रकार घडला. या प्रकारावर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आक्षेप घेतला. ज्यांच्या बोटाला शाई लावली त्या काही मतदारांना निलेश लंके यांनी पकडले. तसेच त्यांच्याकडे एक शाईची बाटली आढळून आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. नगर शहरातील या मतदान केंद्रावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मतदारांना मतदान केंद्राच्या बाहेर परस्पर बोटाला शाई लावून त्यांना मतदान करू देण्यास प्रतिबंध घालण्यात आला. याचा एक व्हिडिओ अहमदनगर शहरात व्हायरल झाला आहे. अहमदनगर तालुक्यातील बुऱ्हानगर येथील मतदान केंद्रावरील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते. याबाबत निलेश लंके यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला.

मतदान न करता बोटाला शाई लावून घरी पाठवण्यासाठी मतदारांना पैसे वाटप झाल्याचाही संवाद या व्हिडिओत दिसत आहे.मतदान न करण्यासाठी आम्हाला पैसे देण्यात येत होते जवळपास 300 लोक लोकांसाठी हे पैशांचे वाटप झाले होते हजार रुपये ठरले होते मात्र पाचशे रुपये दिले जात असल्याचेही संवाद या व्हिडिओत एका मतदाराने दिला आहे यावेळी निलेश लंके उपस्थित होते हे मोठ रॅकेट असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024:Ink applied to finger without voting, efforts at city polling station to reduce voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.