सांस्कृतिक वारसा जपणा-या युनेस्कोच्या यादीत मुंबईतल्या 4 वारसास्थळांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 23:01 IST2017-11-07T22:54:41+5:302017-11-07T23:01:07+5:30

आशिया पॅसिफिक देशातील सांस्कृतिक वारसा जपणा-या स्मारकांसाठी युनेस्कोने पुरस्काराची घोषणा केली आहे.
यात देशातील सात स्मारकांचा समावेश असून, त्यापैकी चार स्मारके मुंबईतील आहेत.
मुंबईतील ४ वारसास्थळांमध्ये ख्रिस्त चर्च (भायखळा चर्च), रॉयल बॉम्बे ऑपेरा हाऊस या दोन वारसास्थळांना गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
बोमनजी होरमजी वाडिया फाऊंटन अँड क्लॉक टॉवर, वेलिंग्टन फाउंटन या दोन वारसास्थळास विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सांस्कृतिक वारसा जपणा-या स्थळांचा असा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव होत असला तरी त्यांच्या संवर्धनासह देखभाल-दुरुस्तीबाबत प्रशासन उदासीन आहे.