पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न; यवतमाळच्या शेंबाळपिंपरीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 11:15 AM2022-06-24T11:15:02+5:302022-06-24T11:15:29+5:30

प्रमोद पानपट्टे यांनी पाणी समस्या घेऊन यापूर्वी इतर तीन गावकऱ्यांसोबत ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले होते.

Self-immolation attempt for water; Incident at Shembalpimpri in Yavatmal | पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न; यवतमाळच्या शेंबाळपिंपरीतील घटना

पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न; यवतमाळच्या शेंबाळपिंपरीतील घटना

Next

शेंबाळपिंपरी (यवतमाळ) : पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील प्रमोद दशरथ पानपट्टे यांनी गावातील पाणी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रमोद पानपट्टे यांनी पाणी समस्या घेऊन यापूर्वी इतर तीन गावकऱ्यांसोबत ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले होते. त्यांचे उपोषण समस्या निकाली काढण्याची ग्वाही देऊन सोेडविण्यात आले होते. तहसीलदारांनी त्यांना हे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप गावातील पाणी समस्या सुटली नाही. पाण्यासाठी दोनदा मोर्चा काढण्यात आला. तरीही पाणी समस्या काही भागात कायम आहे.

बुधवारी सायंकाळी प्रमोद पानपट्टे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासोबत पाणी का सोडत नाही, यावरून वाद घातला. त्यानंतर जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना फोनवरून जनतेला पाणी व्यवस्थित मिळत नसल्यामुळे आत्महत्या करतो, असे सांगितले. लगेच त्यांनी बसस्थानक परिसरात हातात डिझेलची बाटली घेऊन अंगावर ओतली. आगपेटीने काडी लावत असतानाच काही ग्रामस्थ व खंडाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे ओले कपडे, आगपेटी आणि डिझेल बाटली असे साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Self-immolation attempt for water; Incident at Shembalpimpri in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.