Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: सुखा-समाधानाचा दिवस, विविध लाभ; मन प्रसन्न होईल

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील.
वृषभ: स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. हातून परोपकार घडेल.
मिथुन: आजचा दिवस सुखा-समाधानात जाईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. जास्त भावनाशील होऊ नका.
कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. मनाच्या प्रसन्नतेमुळे दिवसाचा आनंद वाढेल.
सिंह: मोठ्या लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.
कन्या: भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात.
तूळ: मनात सतत विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो.
वृश्चिक: कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. मित्रांकडून लाभ होईल.
धनु: एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल.
मकर: अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा.
कुंभ: व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल.
मीन: कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल.
क्लिक करा