उपवन तलावातील छटपूजा वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:32 PM2019-11-02T23:32:59+5:302019-11-02T23:33:15+5:30
आयोजकांमध्ये पडले दोन गट । मनसे घेणार पाण्याचे नमुने
ठाणे : ठाण्यातील उपवन परिसरात शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या आणि रविवारी होत असलेल्या छटपूजेच्या निमित्ताने अयोजकांमध्येच दोन गट पडल्याने अंतर्गत वातावरण चांगलेच तापले होते. यातील एका आयोजक गटाने कृत्रिम तलाव परिसरात पूजा करण्याचा निर्णय घेतला, तर दुसऱ्या गटाने नैसर्गिक तलाव परिसरातच छटपूजेचे आयोजन केल्याने यानिमित्ताने वादंग होण्याची चिन्हे आहेत.
स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून रुद्र प्रतिष्ठानने उपवनच्या कृत्रिम तलाव परिसरात ही पूजा करण्याचा निर्णय घेतला असून या गटाला मनसेनेदेखील पाठिंबा दर्शवला आहे. तर, छटपूजा संस्था ठाणेने पूजेला येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने हा कृत्रिम तलाव अतिशय अपुरा असून त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नैसर्गिक तलाव परिसरातच छटपूजेचे आयोजन केल्याने यानिमित्त दोन्ही गटांच्या वतीने यानिमित्त शक्तिप्रदर्शन केल्याचे समोर आले आहे.
ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून उपवन तसेच शहरातील अन्य ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. शनिवारी संध्याकाळपासून या छटपूजेला सुरु वात करण्यात आली असून शनिवारीदेखील ती होत आहे. मात्र, यानिमित्ताने होणारा संघर्ष हा मनसे आणि छटपूजा आयोजकांमध्ये कमी, मात्र तिचे आयोजन करणाºया दोन आयोजकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.
उपवन तलाव परिसरात दोन ठिकाणी छटपूजेचे आयोजन करण्यात आले असून एका बाजूला पालिका प्रशासनाने बांधून दिलेल्या कृत्रिम तलाव परिसरात ती होत आहे. या परिसरात रु द्र प्रतिष्ठान आणि ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. दुसरीकडे छटपूजा संस्थेच्या वतीने पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नैसर्गिक तलाव परिसरात सर्व प्रकारची तयारी करून पूजेचे आयोजन केले आहे.
रु द्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या छटपूजेचे आयोजक धनंजय सिंग यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने जो कृत्रिम तलाव तयार केला आहे, त्याच परिसरात ती होणे योग्य असल्याचे सांगितले.
या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून नैसर्गिक तलावालादेखील कोणत्याही प्रकारची बाधा येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व सुविधा निर्माण करण्यामध्ये पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचेदेखील मोलाचे योगदान असून केवळ नैसर्गिक तलाव परिसरात ही पूजा करणे, ही योग्य भूमिका नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे छटपूजा संस्थेचे आयोजक सुखचंद पाठक यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी येणाºया भाविकांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव परिसरात भाविक मावणार नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत कृत्रिम तलाव मोठा केला जाणार नाही, तोपर्यंत नैसर्गिक तलाव परिसरातच पूजा केली जाणार असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात कोर्टात जाणार असून सह्यांची मोहीमदेखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलप्रदूषण आढळल्यास तक्रार करणार
कृत्रिम तलाव परिसरात छटपूजेचे आयोजन करावे, या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाºया मनसेच्या वतीने पूजा झाल्यानंतर उपवन तलावाच्या पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. यात जलप्रदूषण आढळल्यास याविरोधात तक्र ार करणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी दिली. प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी ऐनवेळी जर पूजेनिमित्त येणाºयांची संख्या वाढली आणि जर कृत्रिम तलावाचा वापर न करता उपवन तलावात प्रदूषण करणारे घटक टाकले गेले, तर मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.