जबरीने कुलगुरु पदाची खुर्ची बळकावणारे लेल्ला कारुण्यकरा निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 09:09 PM2024-04-29T21:09:10+5:302024-04-29T21:09:18+5:30

आधी कारणे दाखवा नोटीस : विश्व हिंदी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचा निर्णय

Lella Karunyakara, who forcibly usurped the chair of Vice-Chancellor, was suspended | जबरीने कुलगुरु पदाची खुर्ची बळकावणारे लेल्ला कारुण्यकरा निलंबित

जबरीने कुलगुरु पदाची खुर्ची बळकावणारे लेल्ला कारुण्यकरा निलंबित

वर्धा: येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठाच्या कुलगुरु पदाची खुर्ची जबरीने बळकावू पाहणाऱ्या प्रो. लेल्लू कारुण्यकरा यांना विद्यापीठाच्या कार्यकारी परिषेदेने प्रोफेसर पदावरून निलंबित केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कुलगुरूंच्या खुर्चीवर कब्जा केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाचे तत्कालीन प्रभारी कुलगुरु म्हणून प्रो. कारुण्यकरा यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. नंतर त्यांना हटवून डॉ. भीमराय मेत्री यांची नियुक्ती केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती रद्द केली होती. तसेच न्यायालयाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला नियमानुसार नवीन कुलगुरु नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रो. कारुण्यकरा हे ३१ मार्च रोजी विश्वविद्यापीठात आले. ते कुलगुरूंच्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. माहिती मिळताच कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांनी तेथे पोहोचले. त्यांनी प्रो. कारुण्यकरा यांना न्यायालयाच्या आदेशाच्या प्रत दाखविण्याची मागणी केली. मात्र, प्रो. कारुण्यकरा यांनी मला कोणत्याही आदेशाची गरज नाही, मी स्वत: कुलगुरु आहे, असे सांगितले होते. त्यानंतर प्रो. कारुण्यकरा यांनी अनेक आदेश जारी केले होते. त्यात कुलसचिव डॉ. कठेरिया यांच्या निलंबनाचा आदेशही होता.

दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने बोलविलेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीलाही त्यांनी निरस्त केले. कुलसचिव म्हणून डॉ. अमरेन्द्र कुमार शर्मा यांची नियुक्तीही केली. प्रो. कारुण्यकरा यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांचे अपिल खारीज केले होते. तसेच न्यायालय आणि शिक्षण मंत्रालयाने विश्वविद्यालयाच्या कार्यकारी परिषदेला निर्णय घेण्यास सांगितले होते. आता विश्वविद्यालयाच्या कार्यकारी परिषदेने प्रा. कारुण्यकरा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिदो-कान्हू-मुर्मू दलित एवं जनजातीय अध्ययन केंद्राच्या प्रोफेसर/निदेशक पदावरून निलंबित केले आहे. 

यापूर्वी बजावली होती कारणे दाखवा नोटीस

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ५ एप्रिल रोजी विद्यापीठाला कार्यकारिणीची त्वरित बैठक घेण्यास सांगितले होते. त्याअनुषंगाने, कार्यकारी परिषदेची बैठक झाली. त्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, अधिनियम, १९९६ (१९९७चा ३) आणि १७ व्यावसायिक आचार संहिता विद्यापीठ अनुदान आयोग, विनियम, २०१८ च्या संहिता २६ चे उल्लंघन केल्यामुळे परिषदेचे पदसिद्ध सचिव प्राे. कारुण्यकारा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, कारुण्यकरा यांनी सात दिवसांत आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे आता परिषदेने त्यांना निलंबित केले आहे. 

कृष्ण कुमार सिंह प्रभारी कुलगुरु

वरिष्ठ अनुवाद व निर्वाचन विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. कृष्ण कुमार सिंह यांनी २७ एप्रिल रोजी प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते १ जुलै २०१० पासून विश्वविद्यालयात कार्यरत आहेत.

Web Title: Lella Karunyakara, who forcibly usurped the chair of Vice-Chancellor, was suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.