राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 08:11 AM2024-05-20T08:11:28+5:302024-05-20T08:12:04+5:30

फुलपूर मतदारसंघातील पडिला महादेव येथे ही सभा आयोजित केली होती. राहुल व अखिलेश मंचावर आले असताना उत्साहित लोक मंचावर चढले. त्यामुळे मंचावर जागाच शिल्लक राहिली नाही. 

Confusion at Rahul, Akhilesh's campaign rally; Excited to meet the leaders, people broke through the barricades and onto the stage | राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  

राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार अमरनाथ मौर्य यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अचानक गोंधळ झाला. उत्साहाच्या भरात लोकांनी बॅरिकेडस तोडून मंचावर जाण्याचा प्रयत्न केला. 

फुलपूर मतदारसंघातील पडिला महादेव येथे ही सभा आयोजित केली होती. राहुल व अखिलेश मंचावर आले असताना उत्साहित लोक मंचावर चढले. त्यामुळे मंचावर जागाच शिल्लक राहिली नाही. 

स्थानिक नेत्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

लाठीमार करण्यापासून पोलिसांना रोखले
- लोकांना रोखताना पोलिसांनी कसरत झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस सौम्य लाठीमार करणार होते, मात्र राहुल व अखिलेश यांनी त्यांना रोखले.

- पोलिसांनी वेळीच गर्दी नियंत्रित केली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते दान बहादूर मधुर यांनी दिली.
 

Web Title: Confusion at Rahul, Akhilesh's campaign rally; Excited to meet the leaders, people broke through the barricades and onto the stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.