"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास

By अजित मांडके | Published: May 7, 2024 11:18 PM2024-05-07T23:18:08+5:302024-05-07T23:19:42+5:30

चोरीचा माल पचणार नसल्याचा टोला उद्धव सेनेचे संजय राऊत यांनी शिंदेसेनेला लगावला

Uddhav Thackeray group candidates will win wherever there is a stolen bow and arrow symbol by Eknath Shinde group said Sanjay Raut | "ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास

"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्यात दोन ठिकाणी प्रचार करण्याची गरज नाही. एक ठाणे आणि दुसरे बारामती. घटनाबाह्य मुख्यमंत्री  मोदींच्या सहवसात गेल्यापासून खोटे बोलायचे रेटून बोलायचे असे वागत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मुलाला ठाण्यात उभे करायला पाहिजे होतेच. ज्या ज्या ठिकाणी  चोरलेला धनुष्यबाण आहे तिथे मशाल चा विजय होणार. चोरीचा माल पचणार नसल्याचा टोला उद्धव सेनेचे संजय राऊत यांनी शिंदे सेनेला लगावला.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार सभेत मंगळवारी ते बोलत होते. कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत होते. त्याकरिता मुख्यमंत्री कोल्हापूर मधील एका हॉटेल मध्ये शंभर कोटी रुपये घेऊन बसले होते. असा गंभीर आरोपही त्यांनी केला. शिवाजी महाराज यांच्या वंशजाणाच मुख्यमंत्री  हे पराभूत करायला निघाले.असा आरोप राऊत यांनी त्यांच्या भाषणातून केला. पैसे  व्यतिरिक्त यांच्याकडे काय आहे, चोरीचा माल असल्याचेही ते म्हणाले.

4 जून नंतर शिंदे पळतील. स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देश सोडावा लागेल. या दोघांचेही पासपोर्ट जप्त करा. ब्रिटिशांनी लुटला नसेल एवढा देश या लोकांनी दहा वर्षात लुटला आहे . असे राऊत यांनी सांगितले महाराष्ट्रत   चित्र बदलत आहे. मुख्यमंत्री शिंदे  म्हणतात उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या संपत्ती बाबतीत त्यांना विचारले. पण आनंद दिघे यांची खरी संपत्ती असलेला आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदे यांनी हडपल्याचा आरोपही त्यांनी केला.

नरेंद्र मोदी हे नकली फकीर आहे. खरे फकीर हे आनंद दिघे होते, दिघे यांनी गद्दारांना क्षमा नाही असे म्हण्टले होते. हा विचार 4 जून नंतर ठाण्यात अंमलात आणायचा आहे. असेही ते म्हणाले. आनंद दिघेंवर तयार करण्यात आलेला खोटा चित्रपट हा त्यांचा अपमान आहे. ठाणेकर अशा व्यक्तींना माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray group candidates will win wherever there is a stolen bow and arrow symbol by Eknath Shinde group said Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.