ठाण्यातील हवेचा गुणवत्ता स्तर सुधारला

By अजित मांडके | Published: January 16, 2024 04:20 PM2024-01-16T16:20:44+5:302024-01-16T16:21:23+5:30

सरत्या वर्षात महापालिकेच्या माध्यमातून हवेतील प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या गेल्या होत्या.

The air quality level in Thane has improved | ठाण्यातील हवेचा गुणवत्ता स्तर सुधारला

ठाण्यातील हवेचा गुणवत्ता स्तर सुधारला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ठाण्याची हवा बिघडलेली आढळून आली होती. मात्र मागील चार ते पाच दिवसापासून ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. मागील पाच दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा सरासरी १२१ ते १२९ पर्यंत आढळला आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या विविध उपाय योजनांमुळे आता कुठे ठाण्याची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.  ठाण्याची हवा बिघडलेली आढळून आली आहे.

सरत्या वर्षात महापालिकेच्या माध्यमातून हवेतील प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या गेल्या होत्या. परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून आला नव्हता. शहरातील हवेचा निर्देशांक जानेवारीचा पहिल्याच आठवड्यात २२५ पर्यंत गेल्याचे दिसून आले होते.  त्यामुळे  नव्या वर्षातही ठाणेकरांना प्रदुषणाचा फटका बसणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात होता.

  त्यात गेल्या काही महिन्यापासून हवेतील गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे चित्र दिसत होते. त्यात वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना खोकला, सर्दी यांसारखे आजार जडू लागले होते. हि बाब लक्षात घेवून ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावल उचलण्यास सुरुवात केली. त्यातच हवेतील धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांची धुलाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी देखील आता रस्त्यावर उतरुन काही ठिकाणी साफसफाई केली होती. त्यानुसार शहरतील सिमेंट रस्त्यांच्या धुलाईचे काम हाती घेण्यात आले आहे. तर, पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिका क्षेत्रात प्रदूषण रोखण्यासाठी आरएनसी प्लांट बंड करण्याचे आदेश दिले. तसेच प्रदूषण करणाºयांवर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम आता जानेवारीच्या दुसºया आठवड्यात दिसून आला आहे. मागील पाच दिवस ठाण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १२१ ते १२९ पर्यंत आढळला आहे. पहिल्या आठवड्यापेक्षा या आठवड्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १०० ने खाली आल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.

१ जानेवारी २०२४ रोजी हवेच्या प्रदूषणाचा निदेर्शांक १९६ इतका नोंदविला गेला. त्यात वाढ होवून २ जानेवारी २२५ इतका तर, ३ जानेवारी २०२४ रोजी हवेचा गुणवत्ता निदेर्शांक २२३ इतका नोंदविण्यात आला आहे. तर, ४ जानेवारी रोजी निदेर्शांक १९६ इतका नोंदविण्यात आला आहे.

   ठाणे महापालिकेच्या माध्यमातून घोडबंदर, उपवन आणि तीनहात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मोजत आहे. त्यानुसार घोडबंदर भागातील हवा पहिल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात चांगलीच सुधारल्याचे चित्र आहे. त्यातही शहरातील सर्वाधीक वर्दळीचा ठरलेल्या तिनहात नाका या भागातही केलेल्या उपाय योजनांमुळे येथील हवेचा निर्देशांक हा १३१ च्या आसपास आढळला आहे. तर उपवन भागात सुरु असलेल्या बांधकामांमुळे येथील हवेचा निर्देशांक मागील काही दिवस बिघडल्याचे चित्र होते. परंतु १५ जानेवारी रोजी येथील हवेचा निर्देशांक १११ एवढा आढळून आला आहे.

तारीख - हवेतील गुणवत्ता निर्देशांक
   ११ जानेवारी - १२२
   १२ जानेवारी - १२५
   १३ जानेवारी - १२४
   १४ जानेवारी - १२९
   १५ जानेवारी - १२१

Web Title: The air quality level in Thane has improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.