धक्कादायक! ठाण्याच्या पातलीपाडयामध्ये बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:46 PM2020-10-06T23:46:14+5:302020-10-06T23:48:51+5:30

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीगणना झाली नसली तरी येऊर आणि पातलीपाड्याच्या परिसरात बिबटयाचे हमखास दर्शन होत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. दोनच दिवसांपूर्वी पातलीपाडा भागात एका बिबट्याने एका भटक्या कुत्र्याची शिकार करुन त्याला जंगलात नेले.

Shocking! Leopard hunts dog in Patlipadya, Thane | धक्कादायक! ठाण्याच्या पातलीपाडयामध्ये बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

धक्कादायक! ठाण्याच्या पातलीपाडयामध्ये बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

Next
ठळक मुद्देवनविभाग मात्र अनभिज्ञ स्थानिकाने दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा भागात वीज वितरण कंपनीच्या पावर हाऊसजवळून एका बिबटयाने भटक्या कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ही माहिती स्थानिकांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, बिबटयाची चाहूल लागली नसल्याचे ठाणे वनविभागाने स्पष्ट केले.
ठाण्यातील पातलीपाडा पॉवर हाऊस याठिकाणी एक बिबटया आढळून आला असून त्याने या परिसरातील एका भटक्या कुत्र्याची शिकार केली. शिकारीनंतर या कुत्र्याला त्याने जंगलात नेले. हा प्रकार त्याच भागातील एका सुरक्षा रक्षकाने पाहिल्यानंतर मात्र त्याचे भंबेरी उडाली. याच कुत्र्यासोबत असलेली सात पिल्ले सुदैवाने सुरक्षित आहेत. आता हा बिबटया आणि त्या कुत्र्याचा शोध वनविभागामार्फत घेण्यात येत असल्याचे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. स्थानिकांची ही माहिती असली तरी हा बिबटया परिसरात आढळून आला नसल्याचे येऊरचे परिक्षेत्र वनअधिकारी राजेश पवार यांनी सांगितले.

Web Title: Shocking! Leopard hunts dog in Patlipadya, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.