उत्तर भारतीय नेत्याला शिवसैनिकांचा चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:31 AM2019-10-13T00:31:09+5:302019-10-13T00:32:42+5:30

अंबरनाथमधील घटना । पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला राडा, अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

Shiv Sena workers beat North Indian leader in ambernath | उत्तर भारतीय नेत्याला शिवसैनिकांचा चोप

उत्तर भारतीय नेत्याला शिवसैनिकांचा चोप

Next

अंबरनाथ : शिवसेनेच्या उत्तर भारतीय नेत्याला अंबरनाथच्याच शिवसैनिकांनी चोप दिला आहे. आमदारांना प्रचारासाठी शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात नेत असताना नगरसेवकांना त्याची कल्पना दिली जात नसल्याच्या रागातून हा चोप दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घडला.


उल्हासनगरमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अंबरनाथमध्ये आले होते. त्या ठिकाणी शहरातील काही स्थानिक नेत्यांसोबत पालकमंत्र्यांनी चर्चाही केली. या चर्चेसाठी काही कार्यकर्ते आणि पदाधिकारीही अंबरनाथ स्टेशन परिसरातील एका हॉटेलसमोर उभे होते. पालकमंत्री आतमध्ये चर्चा करत असताना बाहेर एका नगरसेवकाचे शिवसेनेच्याच उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यासोबत वाद झाला. आमदारांना प्रचारासाठी आणताना हा उत्तर भारतीय पदाधिकारी पुढेपुढे करत असल्याची तक्रार यावेळी शहरप्रमुखांकडे करण्यात आली. याप्रकरणी शहरप्रमुखांनी मध्यस्थी करून या उत्तर भारतीय नेत्याची समजूतही काढली. शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात प्रचारासाठी येताना त्या स्थानिक नगरसेवकाला त्याची कल्पना देणे, ही शिवसेनेची शिस्त आहे. केवळ एकाच नव्हे तर दोन ते तीन प्रभागांत असा प्रकार घडल्याने यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना शहरप्रमुखांनी दिली.


शहरप्रमुख त्या ठिकाणाहून निघून गेल्यावर उत्तर भारतीय नेत्याचे एका शिवसेनेच्या नगरसेवकासोबत पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर, मात्र थेट हा प्रकार हाणामारीवर गेला. या उत्तर भारतीय नेत्याला एका नगरसेवकाने आणि त्या ठिकाणी असलेल्या काही अंगरक्षकांनी मारहाण केली. अखेर, पालकमंत्र्यांसोबत आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी मध्यस्थी करत हा प्रकार रोखला. शुक्रवारी झालेल्या या राड्यात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे.

भाजपच्या रॅलीत नगरसेवक आणि नगरसेविकेच्या पतीमध्ये हाणामारी
ठाणे : भाजपच्या प्रचार रॅलीत शनिवारी प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक कृष्णा पाटील, तर नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड हे आपसात भिडले. अखेर, भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी मध्यस्थी करून हे भांडण मिटविले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ही रॅली काढण्यात आली होती.
ठाणे : भाजपच्या प्रचार रॅलीत शनिवारी प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक कृष्णा पाटील, तर नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड हे आपसात भिडले. अखेर, भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी मध्यस्थी करून हे भांडण मिटविले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ही रॅली काढण्यात आली होती.
त्यानंतर, कृष्णा पाटील यांचे नातेवाईक सचिन पाटील यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा वाद आणखी वाढल्यानंतर नगरसेवक कृष्णा पाटील आणि प्रशांत गावंड यांच्यात हाणामारी झाली. अखेर, वरिष्ठांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

Web Title: Shiv Sena workers beat North Indian leader in ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.