आदित्य ठाकरे कोणाबरोबर बर्फात खेळले, नरेश म्हस्के यांचा सवाल

By अजित मांडके | Published: January 16, 2024 04:13 PM2024-01-16T16:13:15+5:302024-01-16T16:14:48+5:30

दावोस दौऱ्यावरुन टीका केली जात असतांना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आता पलटवार केला आहे.

shiv sena thane naresh mhaske target ubt shiv sena leader aaditya thackeray cm eknath shinde | आदित्य ठाकरे कोणाबरोबर बर्फात खेळले, नरेश म्हस्के यांचा सवाल

आदित्य ठाकरे कोणाबरोबर बर्फात खेळले, नरेश म्हस्के यांचा सवाल

ठाणे :  दावोस दौऱ्यावरुन टीका केली जात असतांना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आता पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांची प्रकृत्ती खालावली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. परंतु अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या सोबत असणे आवश्यक असतांना ते दावोसला काय करत होते, दौरा संपल्यानंतरही ते कोणाबरोबर बर्फात मौज मजा करीत होते, हे त्यांनी जाहीर करावे असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या डावोस दौऱ्यावर आहेत. परंतु या दौऱ्यावरुन उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका केली जात आहे. त्या टिकेला म्हस्के यांनी उत्तर दिले आहे. वास्तविक त्यावेळेस दावोस दौऱ्याला उद्योगमंत्र्यांनी जाणे आवश्यक असतांना पर्यटनमंत्री का गेले असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे आदू बाळ खरच आदू असून त्यांचा स्मृती भ्रंष झाल्याचेही ते म्हणाले. लहानपणी खाऊसाठी भांडायचे तसे तेव्हा मुख्यमंत्र्याचे मागे लागून दाओसला गेले होते, अशी टिकाही त्यांनी केली. त्यातही या दौऱ्याला किती जणांना ते घेऊन गेले होते, ते देखील जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. नियमानुसार आम्ही उच्च न्यायालयात गेला असून उबाठा गटातील १४ आमदारांना अपात्र करावे अशी मागणी केली आहे. अध्यक्षांवर दबाव होता, म्हणून त्यांनी १४ आमदारांना अपात्र केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अध्यक्षांना कोणी भिती दाखवली म्हणून त्यांनी तो निर्णय दिला का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

ठाण्यातील सर्व आमदार खासदारांना महाआरतीचे निमंत्रण दिले जाणार आहे. राम मंदिराचे श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, हे खासदार राजन विचारे आणि त्यांच्या नेत्यांनी मान्य करावे आम्ही त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देऊ असेही ते म्हणाले. मात्र जितेंद्र आव्हाड यांना निमंत्रण दिले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्याकडील लोक थाबंवावी यासाठीच महापत्रकार परिषद घेतली गेल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच आपले अस्तित्व दाखविण्यासाठीचा हा केवीलवाणा प्रयत्न असल्याचेही टिकाही त्यांनी केली. ज्यावेळेस पत्रकारांशी बोलायला हवे ते तेव्हा मी आणि माझे कुटुंब आणि लॅपटॉप यातून ते कधीच बाहेर पडल्याचेही ते म्हणाले.

शिल्लक सेना संपणार
येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्याकडील आमदार, खासदार आणि महत्वाचे पदाधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही म्हस्के यांनी केला आहे.

Web Title: shiv sena thane naresh mhaske target ubt shiv sena leader aaditya thackeray cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.