Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:16 AM2019-09-30T02:16:13+5:302019-09-30T02:17:10+5:30

गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत वाद सुरू होता. तो वाद वाढू न देता काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेच्या ५१ जागांची यादी जाहीर केली.

Maharashtra Vidhan sabha 2019 : Thane Congress & NCP news | Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला!

Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला!

Next

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत वाद सुरू होता. तो वाद वाढू न देता काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेच्या ५१ जागांची यादी जाहीर केली. पहिल्याच यादीत मीरा-भार्इंदर मतदारसंघाची उमेदवारी मुझफ्फर हुसैन यांना जाहीर करुन, वरिष्ठांनी लोकसभेच्या वेळी ठाणे जिल्ह्यातील जागा बदलाबाबत दिलेले आश्वासन जवळपास पाळल्याचे चित्र दिसत आहे. मीरा-भार्इंदर काँग्रेसने घेतल्याने ठाणे विधानसभा मतदारसंघ राष्टÑवादीकडे गेल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठाण्यातील मतदारसंघांत अदलाबदलीची चर्चा झाली. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघ काँग्रेसकडेच राहण्यासाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत, हा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, अशा पद्धतीने काँग्रेसने वातावरण तयार करत त्या जागेवर दावा केला. परंतु,लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे विधानसभा मतदारसंघ सोडणार नसल्याचा दावा राष्टÑवादीने केला. त्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे असतानाच, रविवारी काँग्रेसच्या पहिल्या यादीत मीरा-भार्इंदर येथून मुझफ्फर हुसेन यांचे नाव जाहिर केल्याने ठाणे विधानसभा राष्टÑवादी लढणार हे जवळपास निश्चित करून टाकले. काँग्रेसने दोनवेळा ठाणे विधानसभा मतदारसंघ जिंकला होता. मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी वेगळे लढले होते. काँग्रेसला या मतदारसंघातून १५ हजारांच्या आसपास, तर राष्टÑवादीला २४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. राष्टÑवादीचे मात्र येथे चार नगरसेवक निवडून आले होते. निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून ११ ते १२ इच्छुक आहेत. मात्र, राष्टÑवादी काँग्रेसमधून नगरसेवक सुहास देसाई आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला हे दोघे इच्छुक असल्याचे समजते. शहरात ६० हजार अल्पसंख्याक, तर २२ हजार गुजराती आणि उर्वरित मते महाराष्टÑीयन आणि इतर भाषिकांची आहेत. शहरातील जुन्या ठाण्यात ब्राम्हणांची मतेही आहेत. दुसरीकडे, भाजपमधून विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याऐवजी अ‍ॅड. संदीप लेले यांचे नाव पुढे आले आहे. मनसेकडून अविनाश जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची चिन्हे जास्त दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीत ठरल्याप्रमाणे ठाणे शहर विधानसभा राष्टÑवादीला मिळणार आहे. या मतदारसंघातून नगरसेवक नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे इच्छुक असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले. पहिल्या यादीत जिल्ह्यातील दोन जागांवरील उमेदवार जाहिर झालेत. ठाणे मतदारसंघाबाबत दुसऱ्या किंवा तिसºया यादीत नाव जाहिर होईल, असे काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी सांगितले.

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीत आतापासूनच नाराजीचा सूर

अंबरनाथ: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा पेच अखेर सुटला आहे. या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असताना, वरिष्ठांनी ही जागा काँग्रेसला दिली आहे. काँग्रेसने रोहित साळवे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ही जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती.

गेल्यावेळी आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट मते मिळाली होती. त्याच आधारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही जागा मागितली होती, तर राष्ट्रवादीनेदेखील ही जागा आपल्याकडेच राहावी, यासाठी आग्रह केला होता. अशा प्रकारे रस्सीखेच सुरू असताना, ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.

काँग्रेसच्या यादीमध्ये रोहित साळवे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. साळवे हे अंबरनाथ विधानसभा क्षेत्रामध्ये येणाºया उल्हासनगरचे रहिवासी आहेत. साळवे यांच्या मातोश्री उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक आहेत. उल्हासनगरचा काही भाग अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात येत असल्याने साळवे यांनी या जागेवर दावा केला होता.

अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी या जागेसाठी अनिता प्रजापती आणि रोहित साळवे यांची नावे पक्षाकडे पाठवली होती. त्यातून साळवे यांची निवड झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसला पुढाकार घ्यावा लागणार आहे.

मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात आघाडीची खेळी अपेक्षितच

मीरा रोड : मीरा भार्इंदर मतदारसंघातून माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांना उमेदवारी जाहीर करुन, आघाडीने अपेक्षित अशीच खेळी खेळली आहे. मुझफ्फर हुसैन यांना त्यांच्या उमेदवारीबाबत पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आधीपासूनच या मतदारसंघात प्रचार सुरु केला होता. २००९ साली आघाडीने मुझफ्फर यांच्या उमेदवारीला हुलकावणी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी उमेदवारी मिळवत निवडणूक जिंकली होती. २०१४ च्या मोदी लाटेत याकुब कुरेशी यांना २१ हजार मतं मिळाली होती. २०१७ च्या पालिका निवडणुकीआधी मेंडोन्सा यांनी सेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०१९ची विधानसभा लढवण्याची तयारी मुझफ्फर यांनी चालवली होती. लोकसभेसाठी त्यांनी राट्रवादीचे आनंद परांजपे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. परांजपे यांना येथून ६३ हजार मतं मिळाली.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019 : Thane Congress & NCP news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.